shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नायगाव येथील शेतकरी दत्तात्रेय खोडसे यांचे दुख्खद निधन..!!

                             ====================================        
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                                                   
केज तालुक्यातील नायगाव येथील सुपुत्र व नायगाव पंचक्रोशीतील सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात देणारा सर्व सामान्य कार्यक्रता अशी ज्यांची ओळख होती असे दत्तात्रेय अण्णासाहेब खोडसे यांचे दिनांक २१ आॅगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुख्खद निधन झाले.  दत्तात्रेय खोडसे हे केज तालुक्यातील अनेक गोरगरीब रूग्णांना महागडे उपचार आणि शस्त्रक्रिया मुंबई येथील ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देत होते. ते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून केज परिचित होते. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जात होते.                     


शेकापचे तालुका अध्यक्ष प्रविण खोडसे यांचे ते सख्खे चुलते होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुन,नातवंडे असा परिवार आहे. दत्तात्रेय अण्णासाहेब खोडसे यांच्या दुख्खद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
close