shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्टातील मोडकळीस आलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरसकट दहा हजारांची तातडीची मदत द्या -- रमेश गालफाडे..!!

============
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                 ===============   ===============              
केज येथे  बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांची नवनिर्धार संवाद अभियान चला भेटुया नवे संकल्प आखुया या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या अभियाना निमित्ताने रमेश गालफाडे यांनी केज व बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांशी संवाद साधताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना व इतर संकटानी मोडकळीस आलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरसकट दहा हजार रुपये मदत करून जगण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली आहे                         


तर महाराष्ट्रात देशातील क्रमांक एक चे कार्यक्षम मुख्यमंत्री असतानाही वंचित समाजाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे मत लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले. 

बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियान च्या माध्यमातून १८ जुलै ते ५ सप्टेंबर पर्यत चालणाऱ्या अभियानातून उपेक्षित वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचे उपेक्षिताच्या महामंडळाकडे अजिबात लक्ष न देता फक्त आपापल्या परीवाराच भल करण्यात लागलेले असून शिखर बँकेच्या माध्यमातून फक्त परिवार सक्ष्मीकरणाकडे लक्ष देत असल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केज येथे पत्रकार परिषदेत केला . 
बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे व महिला प्रदेश अध्यक्ष  कोमाल साळुंखे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून नवनिर्धार संवाद अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात असून आता पर्यंत आठ हजार कि. मी. चा प्रवास पुर्ण झाला आहे. 

ग्रामीण भागातील वंचित वर्ग सध्या खूप अडचणीत आहे अश्यातच महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षे होत आली परंतु मागास वर्गासाठी असलेले महामंडळे हि फक्त साडेचार हजार कर्मचारी जगवण्यासाठी आहेत की वंचित लोकांना कर्ज देऊन पायावर उभा करण्यासाठी आहे हे कळेना झालाय कारण या दोन वर्षात या महामंडळाना एक रुपया पण दिला नाही . देशात क्रमांक एकचे यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्रात असतानाही वंचित वर्गाकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही परंतु शिखर बँकेच्या माध्यमातून साखर कारखानदारी व आपापले परिवार गडगंज करण्यासाठी काम करत असल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला . 

यावेळी प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे यांनी सांगितले की सध्या आम्ही निर्धार संवाद अभियानातून प्रत्येक ठिकाणी वंचित समाजाच्या समस्या जाणून घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत व पाच सप्टेंबर ला मुख्यमंत्री महोदयाना भेटून या सर्व वंचित समाजाच्या प्रश्नांना लवकर न्याय द्यावा व लहान व्यावसायिक व टपरीधारकांना सरसकट दहा हजार रुपये देण्यात यावे अशी विनंती करणार आहोत .

महिला प्रदेश अध्यक्ष कोमल साळुंखे यांनी शांततेच्या मार्गानी प्रश्न सुटावेत अस आम्हाला वाटतय परंतु जर रस्त्यावर उतरून तोडफोड केल्याशिवाय सरकारला वंचित समाजाकडे लक्ष द्यायचे नसेल तर मात्र आम्ही त्या पध्दतीचा पण अवलंब करु असा इशारा पण यावेळी देण्यात आला*.
close