इंदापूर तालुक्यात पुन्हा तहसीलदार श्रीकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल रूई बाबीर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा..
श्रीकांत पाटील हे इंदापूर तालुक्याच्या इतिहासात झिरो पेंडन्सीत काम करणारे अधिकारी.. तानाजी मारकड.
फोटो: तहसीलदार श्रीकांत पाटील
इंदापूर प्रतिनिधी: (दि.७ ऑगस्ट २०२१) रूई बाबीर येथे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार म्हणून श्रीकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, महेश गडदे, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते, सचिव शंकरराव मारकड, तानाजी मोहिते व ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
श्रीकांत पाटील यांनी या पूर्वी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार म्हणून लोककल्याणकारी, लोकाभिमुख, सामान्य गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांना केंद्र बिंदू मानून काम केले होते, त्यांनी झिरो पेंडन्सी काम केले होते,आजपर्यंत च्या तालुक्याच्या इतिहासात झिरो पेंडन्सी काम करणारा अधिकारी पहिल्यांदा मिळाला होता, मागील काही वर्षी त्यांची बदली झाली होती. तेंव्हा लोकांनी इंदापूर मध्ये उपोषण केले होते, त्यांच्या बदलीनंतर सुध्दा त्यांच नाव सामान्य गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी, यांच्यामुखामध्ये यायचं. अशाप्रकारे कामाच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पहिला तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणून त्यांचे नाव घेतले जाते, त्यामुळे त्यांची फेरनिवड इंदापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी झाल्यामुळे नागरिकांना आनंदी आनंद झाला असून तालुक्यांमध्ये विविध प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय, अशाप्रकारे रूई-बाबीरनगरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी त्यांच्या कामाविषयी लोकांमध्ये असणारे प्रेम याविषयी पेढे वाटताना जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी आपले विचार व्यक्त केले.

