shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन व इतर सहयोगी संस्थांतर्फे १२ गावातील पूरग्रस्तांना मदत...!!

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
शिर्डी एक्सप्रेस LIVE.
९९६०५९५८०७

एरंडोल:-आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन,कल्याण ,  लक्ष्‍मण राठोड मित्रपरिवार तसेच अनिल ट्रान्सपोर्ट आणि संजय कारिरा मित्र परिवार व व्यापारी वर्ग आणि उल्हासनगर चे प्रसिद्ध व्यापारी हरीश लालवणी यांनी 25 क्विंटल गहू आटा दिला.यांच्यातर्फे पुरग्रस्त भागातील गावं.भावे. जाधव वाडी. गुरव वाडी. कुंभारवाडी. सुतारअली. महोत. आकले. भोराव. गावडी.टेमघर. आसनपोई.महाड या १२ गावांना सामाजिक जाणिवेतून जीवनावश्यक वस्तूंचा तसेच वैद्यकीय साधनांचा  पुरवठा करण्यात आला  .
सदर कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी स्थनिक व्यापारी, वाहतूक कंपन्या तसेच सेवातत्पर व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन आरोग्यंम धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील आणि लक्ष्मण राठोड यांनी केले होते, त्यांच्यातर्फे विविध संस्थांच्या समन्वयातून सदर मदतकार्य पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
सदर मदतकार्य सुरू असल्याबाबत सर्व संस्थांचे व पदाधि कार्याचं सर्व  स्तरातून कौतुक होत आहे.

पुढील कार्यास अजुन जास्तीत जास्त मदत मिळावी या हेतूने अजुन आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याने दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सर्व संस्थांनी केले आहे .
विशेष सहकार्य :- आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे पदाधिकारी. मुक्ता जाधव. सचिन नाईक. तन्वी हुलवले. नूतन चौगुले.अभिजित राजपूत.आपली मदत देण्यासाठी अध्यक्ष जितेन्द्र पाटील याच्याशी 9970219877 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
close