shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीच्या बैठकीत स्वप्निल सावंत यांनी इंदापूर तालुक्यातील विद्युत पंपाचे वाढीव बिला संदर्भात केला प्रश्न उपस्थित

पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीच्या बैठकीत स्वप्निल सावंत यांनी इंदापूर तालुक्यातील विद्युत पंपाचे वाढीव बिला संदर्भात केला प्रश्न उपस्थित .
इंदापूर प्रतिनिधी: (३ ऑगस्ट २०२१)पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक  पालकमंत्री अजित  पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली.

या बैठकीस २२ विधानसभेचे आमदार सर्व प्रमुख अधिकारी व ६ शासन नियुक्त लोकप्रतिनिधी , यामध्ये इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य स्वप्निल सावंत यांना लोकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याची संधी मिळाली  असता त्यांनी  इंदापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर वर असलेले विद्युत पंपाचे वाढीव बिला संदर्भात प्रश्न उपस्थित केला. 

यामध्ये  इंदापूर उपविभागा मधील २०१२ मधील "महावितरण आपल्या दारी" या योजने अंतर्गत साधारण १५०० ते २००० कनेक्शन लाइन चे काम बाकी असल्याचे निदर्शनास आणून दिले.

       यावर उत्तर देताना बारामती मंडल अधिकारी  पावडे  यांनी तात्काळ दोन्ही विषयामध्ये लक्ष देत संबंधितांना सूचना देतो असे उत्तर दिले .

    विद्युत वितरण संदर्भात कोणाला काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
close