shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंकिता पाटील यांच्या हस्ते बावडा येथे नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

अंकिता पाटील यांच्या हस्ते बावडा येथे नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

इंदापूर प्रतिनिधी: (३ ऑगस्ट २०२१) बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे (दि.३ ऑगस्ट) बावडा येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी कु.अंकिता पाटील म्हणाल्या की बावडा परिसरात गरजू  रुग्णांना मोफत ऍम्ब्युलन्स सेवा मिळावी याकरिता  नवीन रुग्णवाहिकेची खरेदी केली आहे, रुग्णांना ʼʼगोल्डन आवर्सʼʼ मध्ये  उपचार मिळावे.या  रुग्णवाहिकेचा १०८ नंबरला कॉल करून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

यावेळी  बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, बावडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे, गोंदी गावचे सरपंच रणजित वाघमोडे, उपसरपंच अंगद देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी अंबिका पावसे, नवनाथ नष्टे, भगवान घोगरे,गणेश लंबाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे, डॉ. विनोद घोगरे, ग्रामस्थ तसेच आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
close