shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खुंटेफळ ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल


प्रतिनिधी-रफिक शेख

आष्टी : (दि .३) : खुंटेफळ वाटेफळ ही तालुका आष्टी मध्ये असणारी गावे बीड आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या नदीकाठच्या छोट्याशा ग्रामपंचायतचा कारभार गेली पंधरा वर्षापासून मोडवे पाटील यांचेकडे आहे. गावातील कुठल्याही नागरिकांच्या अडीअडचणी मध्ये, संकटामध्ये माहिती झाल्या बरोबर तात्काळ धावून जाणारे कुटुंब म्हणून मोडवे पाटील परिवाराकडे पाहिले जाते.

मागील ग्रा. प. निवडणुकीत याच परिवारातील सौ. ज्योती रवींद्र मोडवे या लोकमता मधून गावच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांचे पती श्री रविंद्र उर्फ बंडू पाटील हे नेहमीच गावातील सर्वच कार्यामध्ये हिरिरीने भाग घेत असतात. परमार्थाची समाजकारण आणि राजकारणाला जोड देऊन सदैव जनहितासाठी कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व नक्कीच खुंटेफळ गावच्या विकासासाठी कार्यतत्पर असते. एकात्मिक बाल विकास प्रकल्प बीड अंतर्गत. बीड जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायत हद्दीमध्ये नवीन अंगणवाडीसाठी इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले आहे.
त्याच धर्तीवर आष्टी तालुक्यातील खुंटेफळ विभागाअंतर्गत ३१ स्मार्ट अंगणवाडीचे नवीन इमारतीसाठी शासनाने निधी दिलेला होता.

या निधीचा पुरेपूर उपयोग करून खुंटेफळ च्या हद्दीमध्ये नवीन अंगणवाडी चे बांधकाम सरपंच ज्योतीताई रवींद्र मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेले आहे. सुंदर ,सुशोभित व अध्यावत सुविधा असलेल्या या अंगणवाडी ला खुंटेफळ विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. लवकरच या पुरस्काराचा सन्मान सोहळा खुंटेफळ येथे माननीय गटविकास अधिकारी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये होणार आहे.


खुंटेफळ गावातील सर्व बालकांना अंगणवाडी मध्ये योग्य प्रकारचे बालसंस्कार मिळावे व त्यासाठी सुंदर अशा प्रकारची अंगणवाडी असावी म्हणून सन्माननीय सरपंच ज्योती मोडवे, मा. रवींद्र मोडवे , उपसरपंच रमेश अमृते व सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याच प्रमाणे ग्रामसेविका सौ.गायकवाड मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती वांढरे (आजबे)मॅडम, अंगणवाडी सेविका सौ पूजा अठरे (चौधरी), या सर्वांनी विशेष परिश्रम घेऊन स्मार्ट अंगणवाडी करण्याकरिता परिश्रम घेतले.
खुंटेफळ गावामध्ये सर्व सुविधायुक्त अंगणवाडी इमारतीची उभारणी करत असताना सरपंच सौ ज्योती मोडवे यांनी विशेष लक्ष घालून लहान बालकांसाठी अंगणवाडीमध्ये सर्व प्रकारच्या खेळण्यांचे साहित्य बसविण्यात आले, लहान बालकांसाठी आधुनिक प्रकारचे टॉयलेट, हात धुण्यासाठी बेसिन, साबण, सॅनिटायझर,कंगवा, आरसा, हँडवॉश या सर्व सुविधा अंगणवाडीतील बालकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

शासकीय योजनेतील तरतुदी पेक्षाही जास्त असणाऱ्या सुविधा, एलईडी टीव्ही, सुंदर आणि सुबक खेळण्या, सौर ऊर्जा पॅनल, मुलांना बसण्यासाठी बेंच, किचन रूम त्याचप्रमाणे स्टोअर रूम सुद्धा या इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व इमारतीचे पेंटिंग अतिशय सुंदरपणे चित्र रेखित करण्यात आलेले आहे. अंगणवाडी इमारतीच्या समोर पेव्हर ब्लॉक टाकून सर्व ग्राउंड आकर्षक बनविण्यात आलेले आहे.

 इमारतीच्या चोहोबाजूंनी वृक्ष लागवड करून सभोवतालच्या परिसराला निसर्गरम्य वातावरण बनविण्यासाठी विशेष लक्ष दिले गेले आहे.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन एकात्मिक बाल विकास प्रकल्प आष्टी अंतर्गत माननीय गटविकास अधिकारी श्री. मुंडे साहेब प्रकल्प अधिकारी श्री. सानप साहेब यांनी सरपंच सौ. ज्योती मोडवे यांचे अभिनंदन केले आहे.

लवकरच सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा व प्रथम क्रमांक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे अशी माहिती श्री. रवींद्र मोडवे यांनी दिली .
close