shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची संवेदनशीलता..!!


पूरग्रस्त केवनाळे ता.पोलादपूर दुर्घटनेतील साक्षी दाभेकर आणि प्रतिक्षा दाभेकर या दोन्ही जुळ्या बहिणींच्या शैक्षणिक पालकत्वची उचलली जबाबदारी

डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून साक्षीच्या रुग्णालयातील उपचारासाठी  सर्वोतोपरी आर्थिक मदत तसेच दोन्ही बहिणींचा पुढील शिक्षणाचा सर्व खर्चाची जबाबदारी

2 महिन्यांच्या बाळाला वाचविण्याऱ्या साक्षीच्या अतुलनीय धाडसाचे ना.शिंदे साहेब यांचेकडून कौतुक

साक्षीचे धाडसी कार्य

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७

मुंबई: पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय १४) ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती.  तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले असून 'केईएम'मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचे प्रश्नचिन्ह उभे राहिला होता.

ही मुलगी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते. पण आता तीला पाय गमवावा लागलाय. कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जातं होत. 

ABP माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिले होते. याची दखल घेत नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी साक्षीला मदत करण्याचा निर्णय घेतला.
close