--------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील साळेगाव येथे एकाने डीपीतील फ्यूज फोडून नुकसान केल्या प्रकरणी वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाच्या तक्रारी वरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० वाजता साळेगाव येथील अशोक राजाभाऊ गाढवे याने घाडगे डीपीचे फ्यूज फोडून नुकसान केले. अशा आशयाची तक्रार वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रमाकांत डिकले यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या नुसार अशोक गाढवे याच्या विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा भा.दं.वि. ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

