लाखेवाडीतील व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता खाडे-ढोले यांचा ‘स्नेहदर्पण' पुरस्कार देऊन सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: (२२ ऑगस्ट २०२१) विधानभवन मुंबई येथे फलटणच्या मुधोजी हायस्कूल ग्रुपच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावच्या व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता खाडे-ढोले यांचा ‘स्नेहदर्पण' पुरस्कार देऊन सत्कार समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला.
शालांत परीक्षा १९९० तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी, अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्ताचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंतांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपराव ढोले महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सह सचिव भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ. सिंगन, तसेच बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्ती, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

