shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गावचे सुपुत्र राजेंद्र पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व..!!

वडापुरी गावचे सुपुत्र  राजेंद्र पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व..!!


 
इंदापूर  प्रतिनिधी :(२३ ऑगस्ट २०२१)
 वडापुरी येथील सामाजिक व राजकीय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे राजेंद्र पाटील यांचा आज २३ ऑगस्ट अभिष्टचिंतन दिन त्याबद्दल त्यांना     
मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.
वडापुरी गावचे  दिवंगत बाबुराव केरुजी पाटील व दिवंगत यशोदाबाई बाबुराव पाटील हे वडापुरी गावचे पाटील होते. त्यांना गावातील सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान मिळत होता . यामध्ये नागपंचमी कावडीचा मान भैरवनाथ यात्रेतील नैवेद्याचा मान असे. तसेच बाबुराव पाटील यांनी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे खजिनदार पद भूषवले तसेच यशोदाबाई पाटील यांनी श्रीनाथ विविध कार्यकारी सोसायटी संचालक पद भूषवले असा वारसा असलेल्या या सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचा सुपुत्र   राजेंद्र पाटील यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक अध्यात्मिक व राजकीय विचारांचा वारसा घेऊन वडापुरी गावात आपल्या मित्र परिवारामध्ये व पाटील परिवारामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आपलं सामाजिक व राजकीय वलय तयार केले आहे.
 पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वडील व कर्मयोगी शंकराव पाटील यांच्या कृपा छायेणे श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे ग्रंथपाल म्हणून १९९७ पासूनआपले कार्य सेवा करीत आहेत. तसेच त्यांनी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ वडापुरी या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.  राजेंद्र पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक आहेत. त्यांचा सरळ साधा निस्वार्थ स्वभाव व कधीही अहंकार न दाखवणारी ही व्यक्ती माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील  यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळखले जातात.त्यांनी आपल्या राजकारणात २०१९ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी लढवली आहे.

वडापुरीत त्यांना  एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. आज त्यांचा २१ ऑगस्ट अभिष्टचिंतन दिवस असल्याने गावातील तसेच भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे मित्र परिवार यांच्यावतीने, तसेच उमेश शिर्के श्री लक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने  त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
close