प्रतिनिधी : संजय वायकर
दहिगाव / ३० : 'नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील समाज मंदिर हरवले' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती.
समाज मंदिर हरवले आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते व दहिगाव ग्रामस्थांनी सदर वास्तु ची तक्रार नगर पंचायत समिती कार्यालय व तहसीलदार कार्यालय नगर यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
पंरतु सध्या विद्यमान ग्रामपंचायत संरपच ग्रामविकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार समाज मंदिराची कागदोपत्री नोंद आहे. मात्र समाज मंदीर कुठे आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. समाजमंदीराबाबत दलित समाजात कुठलीच कल्पना नसल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे.
दलित बांधवांना आता प्रश्न निर्माण झाला आहे, आपल्या दलित वस्ती मधुन समाज मंदिर मुस्लिम मोहल्यात कसे गेले...?
तसेच गावातील चावडी व समाज मंदिर ह्या दोन वास्तु वेगवेगळ्या आहे हे स्थानिक नागरीकांच्या लक्षात आले आहे .
बातमी प्रकाशीत झाल्यानंतर सदरील ग्रामपंचायत कडुन समाजमंदीर असल्याबाबत खुलासा करण्यात आला असला तरी खुलासा करताना पत्रकारांंना दाखवलेल्या समाजमंदीरामध्ये एक कुटुंब रहात असल्याचे दिसुन आले.
मात्र सदरील जागा हि लक्ष्मण शिंदे या मयत व्यक्तीच्या नावे असल्याने संबंधित समाजमंदीराबाबत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे,
*चौकट*
सध्या मी रजेवर असून मला याबाबत कल्पना नाही मी गुरुवारी हजर झाल्यानंतर याबाबत अधिक माहिती देऊ शकते- स्वाती घोडके (ग्रामसेवक,दहिगाव साकत)
*चौकट*
दोन दिवसांपूर्वी माझ्या घराचा फोटो काढून घेऊ गेले होते.नंतर मला गावातील काही नागरिकां कडुन अशी माहिती समजली कि सदर फोटो हा समाज मंदिर म्हणुन दाखवण्यात येत आहे. सदर जागा माझे वडील कै.लक्ष्मण दगडु शिंदे यांच्या नावाने आहे.या जागेचा उतारा देखील आहे.मी या ठिकाणी अनेक वर्षापासून राहत आहे.माझ्यावर अन्याय झाल्यास मी आत्महत्या करेल यास जबाबदार संबंधित अधिकारी, कर्मचारी , लोकप्रतिनिधी असतील- दादाभाऊ शिंदे( घरमालक)
*चौकट*
मौजे दहिगाव मधील समाज मंदिर बांधकाम सन ९१ -९२ साली रो.जवहार योजने अंतर्गत बांधकाम झाले असुन सदर समाज मंदिराचे मुल्यांकन १७ हज्जार ८८४ रूपये खर्च झाले आहे. सदर कामा साठी ८५ टक्के निधी खर्च झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे सध्या समाज मंदिर अस्तित्वात आहे.
मधुकर म्हस्के (सरपंच ,दहिगाव)

