(श्री रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतीष्ठाण चा पुढाकार)
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
तालुक्यातील लाडेवडगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.जयंती उत्सव कार्यक्रमासाठी श्री रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतीष्ठाण ने पुढाकार घेतला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठान चे समन्वयक रमेश पाटोळे ,धिमंत राष्ट्रपाल पाडोळे ,यांची होती.
गणेश कांबळे ,ईश्वर गालफाडे, वैभव कांबळे, विजय कसबे, निरंजन कांबळे ,अजय जाधव, ऋषिकेश गालफाडे ,अभिषेक कसबे ,विकास गालफाडे , नितिन कसबे ,दौलत गालफाडे ,अमोल कसबे, अजय शिंदे, ऋषिकेश कांबळे ,फकीरा लोंढे, मधुकर लोंढे ,बळासाहेब लोंढे, राहुल शिंदे,बालासाहेब लाड, मेजर शेप , अशोक पालके आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रबोधनपर विचार मांडताना पाटोळे म्हणाले की अण्णा भाऊंनी सामान्य माणसांचा उपेक्षितांचा जगण्याचा प्रश्न साहित्यातून उभा केला साहित्यातील नायकाने लढण्याची प्रेरणा दिली ती प्रेरणा घेऊन हे प्रतिष्ठान समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम काम करत राहणार असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रपाल यांनी बोलताना अंधश्रद्धा रूढी परंपरा त्यांचे खंडन करून सुधारणेच्या दिशेने पाऊल टाकने ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.


