shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजप्रुथ्वी ग्रूपने केले तहसीलदारांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे.

तेजप्रुथ्वी ग्रूपने केले तहसीलदारांना  राखी बांधून  रक्षाबंधन साजरे.
इंदापूर प्रतिनिधी:
(२३ ऑगस्ट २०२१) तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने  इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
 डॉ परवीन पठाण ,  फोटोग्राफी क्षेत्रातील ज्योतीताई  शिंदे ,शिक्षिका सीमा खामगळ मॅडम,संगीता गिरमे ,हेल्थ केअर सेंटरच्या पूजा पाधे व इत्यादी महिला उपस्थित होत्या.
यावेळी तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता ताई खरात म्हणाल्या की, इंदापूर तहसीलदार पदी सक्षम अधिकारी म्हणून इंदापुर मध्ये नूकतेच श्नीकांत पाटील यांच्या रूपाने आम्हा महिलांना सक्षम भाऊ मिळाला आहे .त्यामुळे आज आम्ही सामाजिक राजकीय शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन या तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून आमच्या भावाला राखी बांधून आमच्या सर्व महिलांचे रक्षण करावे व इंदापूर तालुक्यातील महिला कशा जास्तीत जास्त सक्षम होतील यासाठी या आमच्या भावानी आम्हाला मार्गदर्शन रुपी भेट रक्षाबंधन दिवशी द्यावी.  

तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने तहसील ऑफिस या ठिकाणी रक्षाबंधन दिन साजरा केल्याने सदर प्रशासकीय ऑफिस मध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले.  
close