shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साळेगाव येथे प्रवाशांच्या निवारा शेडचे काम रोखले : सरपंचाची कार्यवाहीची मागणी..!!


---------------------------------------- 
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज तालुक्यातील साळेगाव येथे महामार्गा वरील प्रवाशांसाठी उभारण्यात येत असलेल्या निवारा शेडचे काम काही जणांनी अडथळा आणून रोखले आहे. त्यामुळे या रोखलेल्या कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.


या बाबतची माहिती अशी की, खामगाव-सांगोला महामार्ग क्र.५४८-सी या महामार्गावर साळेगाव येथे प्रवाशांच्या निवारा शेडची उभारणी सुरू असतांना मागील जागेच्या जागा मालकांनी हे निवारा शेड हे आमच्या जागे समोर नको; असे म्हणून अडथळा आणून काम बंद केले आहे. निवारा शेड नसल्यामुळे या थांब्या वरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वृद्ध नागरिक, स्त्रिया व विद्यार्थी यांना अडचणी येत आहेत. 

दरम्यान सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे यांनी मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवारा शेड उभारण्याची मागणी केली. तसेच विकास कामात अडथळा निर्माण करून काम बंद पडणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना ग्रामपंचायतच्या वतीने पत्र देऊन कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येणार आहे.


रस्त्याचे काम करीत असताना कामगार व त्यांचे अधिकारी यांच्या सोबत काहीजण भांडण करून धक्काबुक्की केल्याचेही प्रकार घडत असल्याने परप्रांतीय कामगार भीतीने काम सोडून जात आहेत.

-------------------------------------------------


"गावच्या हद्दीत जर अशा प्रकारे कामात अडथळा आणून कोणी काम बंद करीत असतील; तर त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि प्रशासन यांनी कठोर कार्यवाही करायला हवी."
--- कैलास जाधव, सरपंच
        साळेगाव ता. केज
close