shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात चोरट्यांनी चक्क ट्रॅक्टरच पळविले..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथून अज्ञात चोरट्यानी चक्क महेंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर पळविला आहे.


केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील अविनाश दिगंबर गिराम या शेतकऱ्याने

उत्तरेश्वर पिंप्री येथे तुकाराम मोहनराव चंदनशीव यांच्या घराच्या बाजुला उभे करून ठेवलेल्या महेंद्रा अर्जुन ५५५ डीएल कंपनीचे ट्रॅक्टरचे लाल रंगाचे हेड ज्याची किंमत ६ लाख रु आहे ते अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले आहे.

ट्रॅक्टरच्या हेडची चोरी झाल्याचे निदर्शनास येताच अविनाश गिराम यांनी दि. २ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ३७५/२०२१ भा.दं.वि. ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे तपास करीत आहेत.
close