shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सासऱ्याने सुनेच्या डोक्यात दगड घालून डोके फोडले..!!


-------------------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-

 केज तालुक्यात घराच्या कारणावरून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात दगड घालून डोके फोडल्याची घटना घडली आहे.


केज तालुक्यातील विडा येथे  राहणाऱ्या सुवर्णा या त्यांच्या पती भारत माने यांच्यासह त्यांच्या सासू सासऱ्या पासून विभक्त राहत आहेत. दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा. ते दोघे त्यांच्या सासर घरी गेले असता वडिलोपार्जित घरी राहण्याच्या कारणा वरून सून सुवर्णा भारत माने व मुलगा भारत माने यांचे सासरा खंडू माने यांच्यात भांडण झाले. खंडू माने यांनी त्यांची सून सुवर्णा हिस शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच सासू बबिता माने हिने पण मारहाण केली. 


या प्रकरणी सून सुवर्णा माने हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला सासरा खंडू माने व सासू बबीता माने यांच्या विरुद्ध भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.
close