प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७
एरंडोल:- येथील नगरपालिकेचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी ५ ऑगस्ट २१ रोजी नगर पालिकेची विशेष सभा पीठासिन अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार पी एस शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका आरती अतुल महाजन यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांना रमेश परदेशी सूचक होते व अनुमोदक अॅड. नितीन महाजन होते.
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी अॅड किशोर काळकर, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, मुख्याधिकारी किरण देशमुख महानंदा ताई पाटील, नगरसेविका छाया दाभाडे, डॉक्टर सुरेश पाटील नितीन चौधरी सरलाबाई पाटील, शेख जहिरोद्दीन कासम, सुरेखा चौधरी, कुणाल महाजन डॉक्टर नरेंद्र ठाकूर प्रतिभा पाटील जयश्री पाटील अभिजित पाटील अॅड नितिन महाजन, वर्षा शिंदे, प्रा. मनोज पाटील नगरसेवक उपस्थित होते.

