shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण( ६३ ) :पिंपळ / अश्वत्थ...!!


पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास कर्क राशीचे नक्षत्र पुष्य हे असून त्याचा आराध्यवृक्ष पिंपळ आहे.

पिंपळ हा दीर्घ आयुष्य असलेला शेकडो वर्षे जगणारा वृक्ष असून पर्यावरण संतुलित राखण्यासाठी या वृक्षाचे फार मोठे सहाय्य लाभते. कारण पिंपळ जास्तीत जास्त  प्राणवायू वातावरण सोडतो. पिंपळ हा वृक्ष औषधी असून याची उंची साठ फूट पर्यंत असते ५००मिलिमीटर पासून पाच हजार मिलिमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात. पिंपळाचा वृक्ष आढळतो.

हा वृक्ष सर्व प्रकारच्या रेताड, मुरबाड, गाळाच्या जमिनीमध्ये तसेच दगडावर देखिल वाढतो.
पिंपळाची पाने फेब्रुवारी/मार्चमध्ये गळतात नि मार्च/एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. पिंपळाच्या झाडाच्या पसाऱ्याहून अधिक याच्या मुळांचा पसारा जमिनीमध्ये दूरवर पसरलेला असतो.  पिंपळाचा विस्तार खूपच मोठा असतो. त्यामुळे पिंपळाच्या सावलीत पशूपक्षांचा अधिवास भरपूर असतो.

पिंपळाची पाने, फुले, फळे औषधी असतात.
पिंपळाची साल जाळून तिची राख थोडावेळ पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास उचकी आणि वांती थांबते.
पिंपळाच्या सालीचा काढा शरीरातील विष नाहीसे करतो.

पिंपळाची सेवा केल्याने पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले आहे. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले असता पिंपळाचा सहवास हा आरोग्यदायी आहे. शरीरातील कफ, पित्त, वात विकारांवर पिंपळाची पाने, साल , फळे हे सर्व उपकारक ठरते. पिंपळाची फळे खाणाऱ्यांचे नपुसकत्व जाते. पिंपळाची कोवळी पाने चावून खाल्ल्यास अथवा त्याचा रस प्यायल्यास अथवा त्याचा काढा करून प्यायल्याने महिलांना मासिक पाळीचा त्रास होत नाही. हिमोग्लोबिन वाढते.

पक्षी आणि झाडावर राहणारे प्राणी यांना पिंपळाच्या फळांचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
कोणत्याही  प्रतिकूल परिस्थितीत पिंपळाचा वृक्ष निसर्गाशी झुंज देत विस्तारत असतो. हे लक्षात घेतले की आपल्याला पिंपळाची प्रतिकारशक्ती किती असेल याची प्रचीती येते. म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढवणे, पौरुषत्व ,महीलांचे विकार या सर्वांवर पिंपळ पाने, फळे याचा वापर करणे लाभदायक ठरते.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close