प्रमोद चौधरी/ जिल्हा प्रतिनिधी
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ७५ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि श्री राजपूत करणी सेनेतर्फे आज पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला.
त्यावेळेस जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या सह शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि जिल्हा अध्यक्ष प्रविण भाऊ सपकाळे व श्री राजपुत करणी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना चिपळूण येथे झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना दिलेल्या मदती बद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि राजपूत करणी सेना मार्फत चिपळूण येथे मदतीच्या ट्रक घेऊन जात आहे येथील तहसीलदारशी संपर्क साधला असता पंधरा जणांची टीम साहित्य घेऊन जात आहे. मी स्तुत्य उपक्रमाबद्दल पत्रकार संघाचे व करणी सेनेचे अभिनंदन करतो व त्यांचे धन्यवाद. की राज्याला आणि देशाला ज्यावेळेस संकट येते आपण सर्वजण संकटामध्ये मुकाबला करण्याची तयारी ठेवतो. हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केला आहे.
