प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : (दि.१५) : स्वातंत्र्य दिनानिमित्त बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने सोलापूरच्या रोड कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत फाउंडेशन चे विश्वस्त श्री .विशाल जकातदार यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.तसेच विजापूर रोड येथील गरजवंतांना ही अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी अनुराग जकातदार, विदिशा जकातदार यांच्यासह सोलापूर महानगरपालिकाचे अधिकारी कुमठेकर साहेब उपस्थित होते .
सामाजिक बांधिलकीतुन बुधभूषण फाउंडेशन चा मदतीचा हात नक्कीच सर्वांना फायदेशीर ठरेल असे फाउंडेशनचे चेअरमन श्री.अमोल दुरंदे यांनी सांगितले .

