shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्धव ठाकरे, अजित पवार व बाळासाहेब थोरात माझेच.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.ना.भरणे यांनी आपल्या वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त.


  उद्धव ठाकरे, अजित पवार व बाळासाहेब थोरात माझेच.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

ना.भरणे यांनी आपल्या वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त.



इंदापूर प्रतिनिधी: सोलापूर महानगरपालिकेने झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला असता कार्यक्रमासाठी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. त्यावेळी ते भाषण करत असताना महापौर यांनी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू म्हणाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावाकडील भाषेत भाषण करत असताना मी डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून देतो, मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या तिकडं... असे बोलून गेले.

त्यामुळे त्या वक्तव्याचा विरोधक तसेच काही माध्यमातून समाचार घेण्यात आला आहे. त्यावर भरणे यांनी पुन्हा एक स्पष्टीकरण देत अजित पवार यांच्याप्रमाणेच बाळासाहेब थोरात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपले ठाकरे यांच्यावर प्रेम असून काही माध्यमांनी त्याला चुकीचे वळण दिल्याचे या वेळी भरणे यांनी स्पष्ट केले व दिलगिरी व्यक्त केली आहे.वास्तविक पाहता भरणे यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने घेतला गेल्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. 


माझ्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो - दत्तात्रय भरणे

४३ एकरामध्ये हे गार्डन एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प शहरवासियांना उभा राहत आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुट्टीमध्ये आनंद घ्यावा असा प्रकल्प आहे. आपणास डीपीडीसी मधुन उत्तम असा निधी देता येईल. यासाठी आपण प्रयत्न करूयात. यावेळी उशीरा आलेल्या महापौर म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांकडुन निधी आणु त्यावर बोलताना भरणे म्हणाले, गार्डन साठी आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून पैसे द्यायचे तर तुम्ही महानगरपालिकेचा तसा प्रस्ताव आम्हाला ताबडतोब सादर करा. मुख्यमंत्र्यांचे नंतर बघू. या माझ्या भाषणामध्ये असणाऱ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला गेला असून त्याबद्दल यात कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

close