shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांनी केला नीरा-भीमा कारखान्याच्या डिस्टिलरी विभागातील सर्व कर्मचारी यांचा सत्कार .

हर्षवर्धन पाटील यांनी केला नीरा-भीमा कारखान्याच्या डिस्टिलरी विभागातील सर्व कर्मचारी यांचा सत्कार .

डिस्टिलरी विभागातून  विक्रमी १ कोटी १८ लाख अल्कोहोल उत्पादन  २२० दिवसामध्ये केल्याबद्दल केला सत्कार.

इंदापूर प्रतिनिधी: डिस्टिलरी विभागातून  विक्रमी १ कोटी १८ लाख अल्कोहोल उत्पादन  २२० दिवसामध्ये केल्याबद्दल  निरा भिमा सहकारी साखर कारखाना डिस्टलरी प्रकल्प इथेनॉल उत्पादन सांगता समारंभ प्रसंगी या विभागातील   डिस्टिलरी मॅनेजर  सुधीर गेंगे-पाटील , डिस्टिलरी केमिस्ट  विक्रमसिंह मोरे, अतुल भोसले, संतोष मगर, सचिन रणमोडे ,प्लांट ऑपरेटर  ज्ञानेश्वर माने- देशमुख , संग्राम गदादे,  गणेश देवकर व वेअर हाऊस चे   प्रीतम राऊत, संतोष गायत्रे, दादासो अनपत, अभिमन्यू चव्हाण व सर्व सेक्शन चे कर्मचारी यांचा विशेष सत्कार करून कौतुकाची थाप देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील आणि चेअरमन ,व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांनी (दि. १६ ऑगस्ट) रोजी केला.
या सत्कारानंतर प्रकल्पातील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्यातील सलोख्याचे विचार, एकमेकांना समजावून आधार देण्याची सामाजिक ठेव, अशा प्रेरक विचारातून अतिशय शिस्तबद्धपणे आनंदी वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आज सत्कार झाल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालेले यावेळी दिसत होते

यावेळी हर्षवर्धन पाटील  म्हणाले की,ज्या कारखान्यात डिस्टिलरी व इथेनॉल निर्मिती चे प्रकल्प नाहीत ते साखर कारखाने आता स्पर्धेत टिकू शकतील की नाही . एकट्या डिस्टिलरी विभागातून कारखान्याला अवघ्या ८ महिन्यामध्ये ६१ कोटी रुपयांचा रेव्हेनिव्ह कारखान्याला भेटला.लवकरच १ लाख लिटर इथेनॉल उत्पादनाचा नवीन डिस्टिलरी नीरा भीमा कारखाना उभारणार आहे व अत्याधुनिक स्पेंट वॉश  इन्सिनरेशन बॉयलर  घेणार आहे त्यामुळे डिस्टिलरी विभागातील सर्व स्पेंट वॉश त्या बॉयलर मध्ये जाळला जाईल त्या मुळे कारखान्यांमधून एक थेंब ही बाहेर जाणार नाही व झीरो लिक्विड डिस्चार्ज होईल. सदरची नवीन डिस्टिलरी ऑक्टोबर २०२२ मध्ये चालू होईल असे नियोजन केले आहे.त्या वेळी कारखान्यातून जवळपास रोज २ लाख लिटर इथेनॉल उत्पादन होईल व त्याचा फायदा सर्व सभासद व शेतकरी वर्गाला होईल.

याप्रसंगी सर्व संचालक मंडळ ,कारखान्याचे कार्यकारी संचालक   ,सर्व खाते प्रमुख ,सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
close