shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगडचे शिल्पकार आणि स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा उल्लेख असलेल्या पायरीवर नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन शिवक्रांती फौंडेशनच्या समाजाहितोपयोगी कार्यास शुभारंभ .

रायगडचे शिल्पकार आणि स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा उल्लेख असलेल्या पायरीवर नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन शिवक्रांती फौंडेशनच्या समाजाहितोपयोगी कार्यास शुभारंभ .
शिवक्रांती फाऊंडेशनने दिला महाड येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात.


शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी:
दि. ७ ऑगष्ट २०२१ रोजी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला "शिवक्रांती फौंडेशन" च्या सदस्यांनी भेट देत रायगडचे शिल्पकार आणि स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा उल्लेख असलेल्या पायरीवर नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" च्या समाजाहितोपयोगी कार्यास शुभारंभ केला.
यावेळी शिवक्रांती फौंडेशनचे पुण्यातून  सदाशिव जाधव, शंकर माने, महादेव धोत्रे करकम हुन  महेंद्र पवार,  महेंद्र पेटकर, मंगळवेढा   ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक महादेव धोत्रे, टेम्भुर्णी  नवनाथ धोत्रे,  लालाजी धोत्रे,  रोहिदास पवार,  विकास माने , वैभव धोत्रे, सापटने चे  प्रशांत धोत्रे, वैराग चे व्यंकटेश देवकर इत्यादी  सभासद सहभागी झाले होते.

यावेळी रायगड येथे पोहोचल्यावर प्रास्ताविक भाषणात  महादेव धोत्रे म्हणाले की, शिवरायांचे स्वामिनिष्ठ शिलेदार श्रीमंत हिरोजी इटळकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याची राजधानी बांधली. बांधकाम प्रमुख म्हणून शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात कार्य केले. दगडात बांधलेले अद्भुत अशी रायगड ची निर्मिती केली. वडार समाजाचे प्रेरणा स्तोत्र म्हणून श्रीमंत हिरोजी इटळकर आपल्याला नेहमी उर्जित करतील आणि आपल्या सर्वांच्या हातून सत्कर्म घडेल! "शिवक्रांती फौंडेशन" नेहमी याची जाणीव ठेवून सतत समाजहितउपयोगी कार्य करत राहतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

तसेच महेंद्र पवार यांनी सांगितले की ,रायगड हे आपल्यासाठी आणि वडार समाजासाठी तीर्थक्षेत्र आहे कारण आपल्या पूर्वजांनी आपले कौशल्य पणाला लावून याची निर्मिती केली आणि राजधानी ची निर्मिती केली. म्हणून आपण सर्वांनी याचा आदर्श घेत "शिवक्रांती फौंडेशन" च्या मधनातून समाजहितोपयोगी कार्य आपण यापुढे असेच चालू ठेऊ.
याप्रसंगी नवनाथ धोत्रे यांनी सांगितले की " सध्याच्या स्पर्धेच्या युगात वडार समाजाची अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. समाज शिक्षणापासून वंचित होतोय आणि गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून शिक्षण, रोजगार, व्यवसाय या त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित "शिवक्रांती फौंडेशन" चे कार्य असेल. वडार समाजाचे स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर  यांनी स्वराज्याच्या राजधानी मध्ये अद्भुत असे वास्तू बांधल्या , शिवरायांचे अनेक गडकिल्ले बांधले परंतु इतिहासकारांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आणि वडार समाजावर अन्याय केलेला आहे. म्हणून इथून पुढे वडार समाजाचे प्रेरणास्रोत्र हे श्रीमंत हिरोजी इटळकर असतील आणि आपण सर्वांनी मिळून खरा इतिहास जगासमोर आणू आणि वडार समाजालाही पुनः वैभव प्राप्त करून देऊन शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवू असा निर्धार व्यक्त केला.

शिवक्रांती फौंडेशन चे ध्येय धोरणे आणि पुढील वाटचलीबद्दल बोलताना  सदाशिव जाधव म्हणाले की ,या आधी वडार समाजासाठी कोणी काय केले याविषयी चर्चा करण्यापेक्षा इथून पुढे शिवक्रांती फौंडेशन च्या माध्यमातून कशा प्रकारे विधायक कामे होतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहू. शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टींवर सध्या ठोस कार्य झाले पाहिजे आणि त्यासाठी योजनाही त्यांनी मांडली. पुढे ते म्हणाले की ,रायगड या सारख्या पवित्र ठिकाणी , शिवरायांच्या, हिरोजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, त्यांचे आशीर्वाद घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" चे कार्य सुरू होतेय यापेक्षा मोठी ती गोष्ट कोणती? वडार समाजाचा अभिमान, स्वाभिमान असलेले श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा ज्वाजल्य अभिमान बाळगून आणि त्यांना आदर्श मानून वडार समाज प्रगती करेल. वडार समाजातील तरुण तरुणी यांनी हा आपला शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 महादेव धोत्रे यांनी संबोधन करताना सांगितले की " वडार समाजातील लहान मुलांसाठी व तरुण तरुणींना कॉम्प्युटर चे ज्ञान देण्यासाठी आणि सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी "शिवक्रांती फौंडेशन" हे खेड्यापाड्यात आणि गाव वस्तीवर संगणक देण्याचा विचार करत आहे.  ज्यानेकरून संगणक हाताळणे आणि संगणक शिक्षण याचा प्रसार होईल.

यावेळी शिवक्रांती फाउंडेशन" च्या वतीने सर्वांनी मिळून शिवसमाधीला पुष्पहार अर्पण केले आणि सर्वांनी आशीर्वाद घेतले.

तसेच श्रीमंत हिरोजी इटळकर यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या पायरीची मनोभावे पूजा करण्यात आले आणि श्रीफळ अर्पण करून शिवक्रांती फौंडेशनचे कार्य सुरू झाले आहे याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! आणि श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा विजय असो!" आणि "जय बजरंग, जय वडार" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवक्रांती फौंडेशन चे हे विधायक कार्य श्रीमंतांच्या दर्शनाने सुरू झाले याचे समाधान आलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक माननीय सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले होते.

त्यानंतर महाड मधील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदतीसाठी सर्व सदस्य महाड मध्ये पोहोचले.
महाड मधील श्री संत निरंकारी भवन येथे भेट घेऊन शिवक्रांती फौंडेशनच्या सदस्यांनी महाड मधील पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये संत निरांकरी मंडळ महाडचे सेवादल शिक्षक  सपकाळ महाराज, बापू महाराज, चंदू महाराज यांच्या सोबत तेथील परिसराचा आढावा घेण्यात आला. महापुरामुळे नुकसान झालेल्या बांधवांचे आणि कुटुंबियांचे सांत्वन शिवक्रांती फौंडेशनच्या वतीने करण्यात आले व त्यांना धीर देण्यात आला.महाड मधील आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या एकूण पंधरा कुटुंबियांना यावेळी शिवक्रांती फौंडेशनच्या वतीने किराणा मालाचे किट देण्यात आले.

अशा प्रकारे शिवक्रांती फौंडेशन चे विधायक कार्य रायगड जिल्ह्यातून झाल्याची माहिती सदाशिव जाधव यांनी दिली.
close