shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज नगर पंचायतने पेंडींग कामे तत्काळ मार्गी लावावेत नसता १५ आॕगष्टला उपोषण - राजु इनामदार..!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

मागील दिड वर्षापासून नगर पंचायत वर प्रशासकीय कारभार आहे सध्या नगर पंचायत पुर्णतः वाऱ्यावर सोडल्या सारखी झाली असून प्रचंड दुरावस्था केज शहराची झाली आहे . लवकरात लवकर नगर पंचायतने स्वच्छता मोहिम हाती घ्यावी , स्वच्छ पाणी प्यायला द्यावे , पथदिवे चालू करावेत व मुलभुत सुविधा कडे लक्ष द्यावे अन्यथा १५ आॕगष्ट रोजी उपोषण करणार असल्याचे नगरसेवक राजु इनामदार यांनी सांगितले . 



केज शहरात १७ प्रभाग असून शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे .डेंग्यु व तापाचे प्रमाण वाढले आहे , नाल्याची स्वच्छता होत नाही , फवारणी केली जात नाही , धुरळणी नाही त्यामुळे शहरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे . पाणी पुरवठा योजना ची पुर्णतः वाट लागली असुन फिल्टर बंद असल्यामुळे घाण पाणी नळाद्वारे येत आहे . नगर पंचायत मधील कर्मचारी काम करत नाहीत , तसेच सुचना फलक व प्रमाणपत्राचे दर दर्शनी भागात लावले पाहिजे . रमाई आवास योजना , पंतप्रधान घरकुल योजना चे हप्ते ताबडतोब वर्ग करावेत तसेच कचरा व्यवस्थापन करण्यात यावे नियमित दररोज घंटागाडी प्रत्येक गल्लीत यायला पाहिजे , शहरातील नाल्या , तुटलेले पुल , रस्त्यावर पडलेले खड्डे याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन मुख्य अधिकारी नगर पंचायत यांच्या कडे देण्यात आले असून सदरील निवेदनावर नगरसेवक राजु इनामदार , अशोक गायकवाड , अजय भांगे , साजेद इनामदार यांच्या सह्या आहेत  . तसेच  १५ आॕगष्ट रोजी नगरपंचायत कार्यालया समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे नगरसेवक राजू इनामदार यांनी सांगितले .

close