■ युवकांना,निर्व्यसनी,सक्षम व नागरिकांना आधार देण्यासाठी संघटनेचा विस्तार - किशोर पिंगळे..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राजमुद्रा सामाजिक संघटनेचे एक मोठं जाळं निर्माण झाल्याने युवकांना नागरिकांना मोठ्या अपेक्षा सुद्धा संघटनेकडून अच् आहेत त्यामुळे बरेच युवक राजमुद्रा सामाजिक संघटनेमध्ये येऊ इच्छित असल्याने रविवारी केज तालुक्यातील राजमुद्रा सामाजिक संघटनेचा विस्तार व बैठक संस्थापक किशोर आप्पा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पशुपतिनाथ दांगट लक्ष्मण जाधव भाऊसाहेब गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पद विस्तार सोहळा व बैठक संपन्न झाली.
राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज भर बीड जिल्ह्यामध्ये ते अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आल्याने संघटनेचे नाव नेहमीच सामाजिक कार्यासाठी चर्चेत राहत आहे युवकांना देखील संघटनेचे कार्य पाहून संघटनेमध्ये कार्य करण्यास उत्सुकता वाढू लागले आहेत किशोर आप्पा पिंगळे यांचे ध्येय धोरणे युवकांना आपलंसं करत आहेत बरेच युवक संघटनेत स्वतःहून काम करण्यास इच्छुक झाल्याने बीड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये विस्तार देखील सुरू केला आहे काल रविवारी केज तालुक्यातील अनेक युवकांना नव पद देऊन काम करण्याची संधी देण्यात आली त्यामध्ये केज तालुकाध्यक्षपदी प्रशांत जाधव,उपाध्यक्षपदी संग्राम पाटील,शहराध्यक्षपदी प्रीतम साळवे,युवक तालुकाध्यक्षपदी रामेश्वर राऊत,तालुका उपाध्यक्षपदी आप्पा शिरसाठ यांच्यासह अनेकांना संधी देण्यात आली यावेळी संस्थापक किशोर आप्पा पिंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना युवकांना मोलाचा संदेश दिला त्यामध्ये युवकांनी निर्व्यसनी राहून स्वतःचे घर सांभाळत आई-वडिलांची सेवा करत नागरिकांच्या सेवेत तत्पर राहिले पाहिजेत त्या ठिकाणी तुम्हाला जी अडचण येईल ती मी पोहोच करेल असा देखील शब्द किशोर आप्पा पिंगळे यांनी युवकांना दिला तसेच जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांनी युवकांना नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेचे ध्येय धोरण काय आहेत आप्पांचे विचार कसे आहेत हे सगळ्यांना सांगितले व कार्य करताना अडचणी आल्यास आम्हाला तुम्ही संपर्क करत रहा असे देखील आवाहन केले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष नगरसेवक पशुपतिनाथ दांगट,नगरसेवक लक्ष्मण जाधव,नगरसेवक भाऊसाहेब गुंड,राजमुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बाप्पा शेळके,जिल्हाध्यक्ष सचिन पवार,वाहतूक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे,जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब खोसे,मराठवाडा संपर्क प्रमुख महेश आलाट,युवक जिल्हाध्यक्ष बबलू सावंत,धारूर तालुका अध्यक्ष उमेश पवार,गेवराई तालुका अध्यक्ष विजय चाळक,उपाध्यक्ष शरद काळे,रवी लोंढे,गोविंद लोंढे ,क्षय पवार,अशोक यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------
युवकांचे सक्षमीकरण व नागरिकांचा आधार म्हणजेच राजमुद्रा संघटनेची स्थापना - किशोर पिंगळे
राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचे पाऊल उचलले जाते त्याचबरोबर नागरिकांना लहान-मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी आधार देण्यासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत त्यासाठीच राजमुद्रा सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे.
- किशोर आप्पा पिंगळे
संस्थापक - राजमुद्रा संघटना महाराष्ट्र राज्य.
-------------------------------------------
राजमुद्रा संघटनेमुळे अनेक युवकांना चांगले मार्ग मिळाले - सुरेश शेळके
राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक युवकांना चांगले मार्ग मिळाले आहेत त्यात संघटनेत आम्ही काम करत आहोत याचा अभिमान तर आहेच परंतु युवकांना चांगला मार्ग दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून करत आहोत यासाठी किशोर आप्पा पिंगळे यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य आणि आधार मिळत आहे.
- सुरेश बाप्पा शेळके
मार्गदर्शक राजमुद्रा संघटना बीड.
-----------------------------------------


