shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजकीय दबावापोटी डीवायएसपी जायभाय यांची बदली केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू- बाबूराव पोटभरे यांचा प्रशासनाला जाहीर इशारा..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-                      

ॲट्रॉसिटी खोटी की खरी म्हणण्याचा अथवा ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायालयालाच असताना आरोपी पक्षाची बाजू घेऊन दाखल असलेली ॲट्रॉसिटी खोटी म्हणण्याचा अधिकार यांना दिला कोणी ? असा सवाल करत डॉ यादव प्रकरणात तपासी अधिकारी डिवाएसपी जायभाये यांची बदली करण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव आणला जात आहे राजकीय दबावापोटी डिवायएसपी जायभाये यांची इतरत्र बदली केल्यास अन्याय अत्याचार पीडित समाजाला सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्यावेळी सर्वांनाच पळता भुई थोडी होईल पीडित मुलीला न्याय देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नये अशी शासनाला विनंती करत असल्याचे बाबुराव पोटभरे यांनी आंबेजोगाईत पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले. 

            




आंबेजोगाई शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या पीडित मुलीवर झालेल्या अन्यायाची रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र त्यातील प्रमुख आरोपी असणाऱ्या डॉक्टरवर पोलिसांनी कार्यवाही केली नव्हती पीडित मुलीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणीसाठी उपोषणही केले त्यावेळी कोणीही राजकीय नेता माझ्या वर झालेल्या अन्याय संदर्भात चौकशी करायला आला नाही एकमेव बाबुराव पोटभरे साहेब माझ्या मदतीला धावून आले त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना बोलल्यामुळे पोलिसांनी न्यायालयासमोर आपला पुरवणी जबाब घेतला त्यात डॉक्टर आरोपी झाल्यानंतर सर्वच नेत्यांना जाग आली आरोपींना वाचवण्यासाठी प्रकरणातील तपास अधिकारी डीवायएसपी जायभाये यांच्या बदलीसाठी काही संघटना ठिय्या आंदोलन करून दबाव आणत आहेत मी एक पीडित मुलगी आहे मुलीवर झालेल्या अन्याय-अत्याचारात जात येथेच कुठे ? असा खणखणीत सवाल पीडित मुलीने पत्रकार परिषदेत केला

       

बाबुराव पोटभरे म्हणाले की आंबेजोगाई हे बुद्धिजीवीचे गाव आहे या शहरात जात पंथ समूह पाहून भूमिका घेतली जात नव्हती मग याच प्रकरणात ठराविक समूह ॲट्रॉसिटी कायदा तसेच प्रकरणाचा योग्य तपास करणारे डिवायएसपी जायभाय यांची बदली करून कोणता संदेश त्यांना द्यायचा आहे हेच समजत नाही पीडित मुलीच्या तक्रारीवरून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या प्रकरणातील प्रमुख भूमिका डॉक्टर यादवचे आहे त्यांच्यावर यापूर्वीही अशा स्वरूपाचे दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची कागदपत्र आम्ही हस्तगत केली आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पोलीस व महसूल प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असेही बाबुराव पोटभरे यांनी सांगितले

              

पोटभरे यांनी बोलता-बोलता अनेक इतर मुद्द्याला हात घातला त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपींना वाचवण्यासाठी आंबेजोगाई शहरात कधीच आंदोलन झाले नाही कोणावर अन्याय अत्याचार झाला तर घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईतील पहिला आवाज बुलंद व्हायचा खरेतर आंबेजोगाईला या दलदलीतून वाचण्यासाठी एकही मोर्चा कोणीही का काढला नाही ? असा आपल्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो या पत्रकार परिषदेला आंबेजोगाईत तीन-चार महिन्यांपूर्वी झालेल्या साठे खून प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहीजे मागणी करण्यात आली यावेळी मयत साठे च्या आईने पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणाची कैफीयत मांडली

          

काही दिवसापूर्वी डीवायएसपी जायभाय यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी म्हणून आंदोलन झाले त्या वेळी आमदार संजय दौंड यांनी मध्यस्थी केली डिवायएसपीना रजेवर पाठविले जाईल असे म्हटले मात्र डिवाय एसपी पुन्हा रुजू झाले पुन्हा आंदोलक आक्रमक झाले मध्यस्थी करणारे आमदार दौंड च्या घरासमोर ठिय्या आंदोलनाची तयारी सुरू केली पण आमदार दौंड म्हणाले 14 ऑगस्ट पर्यंत थांबा आंदोलक थांबले मात्र डीवायएसपी जायभाय यांच्या समर्थनार्थ बाबुराव पोटभरे यांनी आता उडी घेतल्याने प्रकरणात पुढे काय होते पहावे लागेल मात्र डिवायएसपीच्या विरुद्ध एक तर्फी चालणाऱ्या आंदोलनाला प्रति आंदोलनाचा इशारा दिल्याने काय होते ते पहावे लागेल

               

बीड जिल्ह्यात गोरगरीब दलित आदिवासी अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला तर त्यांच्या बाजूने कोणीही नेता लवकर उभा राहत नाही आपल्याला घटनेची माहिती समजताच त्या घटनास्थळी जातो त्यांच्यासाठी लढा देतो न्याय मिळवून देतो म्हणून लोकांचा विश्वास आहे फोन करून प्रत्यक्षात भेटून अन्याय अत्याचार झाल्याची माहिती  लोक देतात आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या पदावर सर्वांचा आवडता डीन यापूर्वी होता तोपर्यंत कोणालाही त्या रुग्णालयात असुविधा दिसल्या नाहीत मात्र आदिवासी समाजाचा डीन डॉ शिवाजीराव सुक्रे येताच सर्वांना गोर गरिबाचे प्रश्न कळू लागले कोणी फोनवर तर कोणी रुग्णालयातील आपल्या हस्तकाकरवी डॉ  सुक्रे यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आपण गोरगरिबांचे प्रश्न घेऊन लढत असल्याने आमदार होऊ शकलो नाही कधीही याची खंत वाटली नाही आमदार पेक्षा जास्त गर्दी कार्यकर्त्यांची माझ्यासोबत सतत असते दुसरे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यात हातभार लागतो हेही नसे थोडके असा विचार करत असतो असे पोटभरे म्हणतात

close