प्रतिनिधी : रफिक शेख
पारनेर : (दि .९ ) : गेल्या तीन महिन्यापासून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे हे आंदोलन व पाठपुरावा करत असताना वडझिरे सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा प्रकरणातील जवळपास 70 लाख रुपये खाते धारकांच्या खात्यावर येणाऱ्या 30 सप्टेंबरपर्यंत जमा करून असे लेखी आश्वासन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगरच्या क्षेत्रीय प्रबंधक रुद्र दत्त यांनी दिले.
गेल्या दोन वर्षापासून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे लाटण्याचा प्रकार या बँकेत घडला होता. त्यामुळे अनेक ठेवीदारांचे पैसे या घोटाळ्यामुळे अडकून पडले होते. पण गेल्या तीन महिन्यापासून या गोष्टींचा पाठपुरावा करत असताना शेवटी बँक प्रशासनाने 30 सप्टेंबर रोजी 70 लाख रुपयापर्यंत जवळपास रक्कम जमा करण्यास लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाचा इशारा मागे घेण्यात आला.
पारनेर तालुक्यातील सेंट्रल बँकेतील अनेक शाखांमध्ये अपुरी कर्मचारी व्यवस्था एटीएम मध्ये पैसे नसणे, पासबुक प्रिंट वेळेवर करून न भेटणे, ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देणे याही गोष्टीमध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्याचा आदेश क्षेत्रीय प्रबंधक यांनी सर्व शाखेमधील बँकेच्या मॅनेजर दिला आहे.
सरकारच्या विविध प्रकारचे योजना पेन्शन धारक यांची मोठ्या प्रमाणात खाती सेंट्रल बँकेत असून त्यांना व्यवस्थित सेवा भेटावे अशी मागणी जितेश सरडे यांनी वेळोवेळी केली होती.
लोकनेते आमदार निलेश लंके यांनी वेळोवेळी या प्रकरणाबद्दल बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती त्यामुळे बँक प्रशासनाला वरील प्रकरण तातडीने हाताळणे गरजेचे झाले होते.
गेल्या एक वर्षापासून आम्ही आमचे खात्यात ठेवलेले पैसे भेटावे त्यासाठी प्रयत्न करत होतो पण त्यात आम्हाला नेहमी उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात होती. पण आमच्या सर्वांसाठी जितेश सरडे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे आज आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे दिलासा मिळाला आहे. आमच्या कष्टाचे पैसे आता बुडणार नाही याची शाश्वती आम्हाला आली आहे.
सुखदेव चौधरी (बँक खातेधारक)
कान्हूर पठार येथे सेंट्रल बँक ही दुसऱ्या मजल्यावर आहे ती खाली यावी अशी मागणी आम्ही केली होती तर त्यासंदर्भात क्षेत्रीय प्रबंधक अहमदनगर रुद्र दत्त यांनी त्वरित पावले उचलून नवीन जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आणि लवकरात लवकर त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली जाईल. असे आश्वासन त्यांनी आम्हास दिले आहे त्याचा पाठपुरावा बँकेचे दुसऱ्या मजल्यावरून स्थलांतर होत नाही तोपर्यंत चालू राहील अशी प्रतिक्रिया विद्युत मंडळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे यांनी दिली.

