shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. नीलेश लंके यांनी घेतला विरोधकांचा समाचार ! बाबुर्डी येथे विकास कामांचा शुभारंभ


पतसंस्था, गोरगरीबांच्या फुकटच्या पैशांवर विरोधकांची मजा

 प्रतिनिधी : रफिक शेख

 पारनेर : (दि .९) : चांगले काम केलेे तरी नावं ठेवण्याचं विरोधकांनी टेंडर घेतले की काय हेच कळत नसल्याचे सांगत तालुक्यातील पुढाऱ्यांची पतसंस्था, गोरगरीबांच्या पैशांवर मजा सुरू असल्याची टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. 

     बाबुर्डी येथे ५० लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचा आ. लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच प्रकाश गुंंड, सरपंच भाउसाहेब भोगाडे, सरपंच बंडूशेठ साबळे, उपसरपंच रविंद्र गवळी, लाला भोंडवे, माजी सरपंच रमेश गवळी, किशोर लगड, गोरक्ष दिवटे, बाबासाहेब ठुबे, सुभाष ठुबे, गणेश ठुबे, चांगदेव ठुबे, अवधूत गवळी, सोपान गारकर, तुकाराम जगताप, एकनाथ जगताप, रणजित दिवटे, सोमनाथ गवळी, मोहन साबळे, संदीप ठुबे, डॉ. मच्छिंद्र दिवटे आदी यावेळी उपस्थित होते. 
     आ. लंके म्हणाले, आज कोणीतरी बिळातून बाहेर येते व यांच्यामुळे, त्यांच्यामुळे कोरोना वाढल्याची टीका केली जाते. दोन दिवस झाले, माझ्या विरोधात वाजत आहे. आम्ही जाब विचाराचा नाही का ? लोकप्रतिनिधीची ती जबाबदारीच असते.ज्या व्यक्तीस मारहाण झाली असे सांगितले जात होते. ती व्यक्तीच मारहाण झाली नसल्याचे सांगत आहे. यावरून विरोधक किती खालच्या पातळीवर राजकारण करीत आहेत याची प्रचिती येते. 

राज्यात महाविकास आघाडी, तालुक्यात मात्र सगळे एकत्र !

     विरोधक त्यांची उर्जा का वाया घालीत आहेत तेच समजत नाही. तसेही चार सहाच विरोधक शिल्लक राहिले आहेत. भाजपवाल्यांचं नेमकं कोण आहे तेच समजत नाही. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी असताना तालुक्यात मात्र माझ्याविरोधात सगळेच एकत्र ! तालुक्यात माझं नाव पुढे आले की सगळेच टवकारतात.
विधानसभेला जे माझ्या विरोधात होते तेच आता जिल्हा परिषद पंचायत समितीला असणार आहेत. त्यांच्यातल्या काहींना मागील निवडणूकीत मीच मदत केलेली असून आज मात्र त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. माझ्यासोबत खादीचे कपडे घालणारे नसतीलही मात्र गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे. 


तालुक्यात सध्या फुकटच्या पैशांवर विरोधकांची मजा सुरू आहे. जे माझ्या विरोधात फिरत आहेत ते पतसंस्थांच्या गाडया वापरत आहेत. नीलेश लंके कोणाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन फीरतो का असा सवाल त्यांनी केला.
कोणीही सांगावे मी कोणाचे दोन रूपये घेतले का ? काही लोक लोकांच्या खिशात हात घालून दोन बोटांनी नोटा काढून घेतात. आम्ही उपाशी राहू मात्र असे धंदे कधीही करणार नाही. काहींचे कुठे प्लॉटींग आहे ? त्यात कमीशन मिळते का ? यावरच लक्ष असते. सख्ख्या भावालही फसविणारे आहेत. हे सगळे व्यवसायीक माणसे आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसे कसे मिळतील ? किमान डिझेलचे तरी मिळाले पाहिजेत यासाठी धडपड सुरू असते. मी मात्र शंभर टक्के समाजकरण करतो. जो समाजासाठी काम करतो त्याच्या पाठीशी परमेश्‍वर असतो. त्यामुळे विरोधकांनी कितीही कुरघोडया केल्या तरी त्यात त्यांना यश येत नाही. घोडा मैदान जवळच आहे. त्यावेळी विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असे आव्हान आ. लंके यांनी दिले.

     जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी आजून आरक्षण जाहिर व्हायचे आहे. पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. त्यामुळे आज उमेदवारीची चर्चा करणे व्यर्थ आहे. अंतिम टप्प्यात उमेदवाराच्या मेेरीटवरच उमेदवारी दिली जाईल. असेे कोणी ठरवू नये की नीलेश लंके असल्यावर माझा नंबर लागेल. मला कोणाकडून २ रूपयांची अपेक्षा नाही. जि. प., पं. स. तसेच बाजार समितीच्या निवडणूकीत मी तसेच माझ्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आपले देशात नाव झाले आहे. परंंतू या निवडणूकांमध्ये कार्यक्रम झाला तर कसे होईल ? अशी मिश्किली करून जनता मला वाऱ्यावर सोडणार नाही असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यकत केला.

     कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण असतानाही आपण मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला नाही. लवकरच मतदारसंघातील १०० कोटींच्या विविध विकास कामांचा शुभरंभ करण्यात येणार आहे.  

     नवीन जोषाचा, नव्या दमाचा सरपंच असेल तर काय घडू शकते हे बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड यांनी दाखवून दिले आहे. गुंड यांच्या पाठपुराव्यामुळे पन्नास लाख रूपयांच्या कामांचा शुभारंभ झाला आहे. गुंड यांनी कामातून त्यांची चूणूक दाखवून दिली आहे. बाबुर्डीतील इतर विकास कामेही टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्याची ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.
close