पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर):-
पश्चिम पन्हाळा परीसरातील अत्यंत दुर्गंम भागातील वाड्या वसत्यावरील शाळा अनेक सुविधा पासुन वंचीत आहेत.
निराधार विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्या मंदिर कांडरवाडी(ता.पन्हाळा).या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य देऊन पुनाळ (ता.पन्हाळा).येथील भिमशक्ती युवा कला,क्रिडा व सांस्कृतिक तरुण मंडळ संचलित शिव-शाहू-फुले-आंबेडकर सार्वजनिक वाचनालय बुध्दविहार पुनाळ यांच्या दूस-या वर्धापण दिनानिमित एक सामाजिक उपक्रम राबवुन समाजापुढे व नव युवकांना प्रेरणादायी आदर्श युक्त अशी संकल्पना राबवुन शैक्षणिक दिशा दर्शक मार्ग बनवला आहे. हे मंडळ सर्व महापुरुषांची जयंती,पुण्यतिथी साजरी करते व त्या अनुषंगाने बालचमुंना स्टेज डेअरींग निर्माण व्हावे. तसेच महापुरुषांती महती व त्यांचे कार्य कळावे यासाठी वकृत्व स्पर्धा आयोजन करुन त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करते.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित कांडर वाडी गावचे डेप्युटी सरपंच तानूबाई लक्ष्मण कांडर, ग्रामस्थ. बाजीराव कांडर,आदर्श शिक्षक.पांडुरंग पाटील, शिक्षण समिती सदस्य सर्जेराव पोवार व मंडळाचे अध्यक्ष तथा संघर्ष बहूजन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सात्ताप्पा पोवार,मंडळाचे उपाध्यक्ष अरुण पोवार,खजानीस दिपक पोवार,सचीव कृष्णात पोवार,धिरज पोवार,सिद्धांत पोवार, विजय डवंग, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थिती होते.मुख्याध्यापिका मनीषा जाधव यांनी आभार मानले.

