shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन


नगर शहराच्या मातीत लोकमान्य टिळकांनी केलेली "स्वराज्याची" घोषणा आजही प्रेरणादायी - किरण काळे 

प्रतिनिधी : संजय वायकर

अ.नगर : (दि .३१) : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अहमदनगर शहरात आठवणी आहेत. बेळगाव, सातारा, वाई असा दौरा करून स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ते नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी नगरच्या माती मधूनच "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !" ही घोषणा केली होती. टिळकांची ही घोषणा आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काळे बोलत होते.

शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्लाट, एससी काँग्रेस प्रदेश समन्वयक नामदेव चांदणे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, राहुल गांधी विचार मंचाचे अध्यक्ष सागर ईरमल, महिला काँग्रेसच्या सुमन काळापहाड, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनिफ शेख, अजय मिसाळ, शहर जिल्हा सचिव ॲड. सुरेश सोरटे, दिपकराव चांदणे, अनिल ननवरे, ऋतिक लद्दे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, एससी काँग्रेस संघटक प्रशांत भिंगारदिवे, विश्वास जाधव, दत्ता भालेराव, जालिंदर उल्हारे, एससी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष जगताप आदींसह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, ब्रिटिशांची दीडशे वर्षांची जुलमी राजवट स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी उलथवून लावली. देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास ७५ वर्ष झाली आहेत. पारतंत्र्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेकांचे बलिदान गेले. मात्र आज ७५ वर्षांनंतर नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही वृत्तीमुळे आपण पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेल्याची भावना या देशातील सर्वसामान्य माणसाची झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा जन कल्याणाचा विचार करणारे स्वराज्य आणण्यासाठी लोकमान्य टिळकांचे विचार हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. 


स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास हा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यसेनानी आणि स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. या लढ्याला दिशा देण्याचे काम हे काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले आहे. त्यातील लोकमान्य टिळकांचा सहभाग हा महत्त्वाचा राहिलेला आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना किरण काळे यांनी केले आहे. 

थोर स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे, खलील सय्यद, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, नाथाभाऊ अल्लाट, नामदेव चांदणे, निजाम जहागीरदार, सागर ईरमल, सुमन काळापहाड, डॉ. हनिफ शेख, अजय मिसाळ, ॲड. सुरेश सोरटे, दिपकराव चांदणे, अनिल ननवरे, ऋतिक लद्दे, मोहनराव वाखुरे, गणेश आपरे, प्रशांत भिंगारदिवे, विश्वास जाधव, दत्ता भालेराव, जालिंदर उल्हारे, संतोष जगताप आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close