shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पदविकाधारक पशुवैद्यकीय संघटनेने प्रलंबित विविध मागण्या संदर्भात आ.लंके यांना दिले निवेदन


प्रतिनिधी : रफिक शेख

   पारनेर : (दि .३१) : पारनेर येथे आंबेगाव व पारनेर तालुक्यातील अनेक पदवीधर पशुवैद्यकीय संघटनेच्या सदस्यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना लेखी निवेदन देऊन आपल्या समस्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्याची व सर्व पशुवैद्यकीय पदविका धारकांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली !

          आमदार निलेश लंके यांच्याकडे मतदारसंघा बाहेरीलही जिल्ह्यातील अनेकांना आमदार लंके यांच्या कार्यावर एक विश्वास निर्माण झाला आहे रविवारी आंबेगाव व पारनेर तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय पदवीधर संघटनेच्या सदस्यांनी लेखी निवेदन आमदार लंके यांच्याकडे सुपूर्द केले.


         अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या साठी राज्यातील खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकांनी काम बंद आंदोलन करीत आहेत त्या आधारे आंबेगाव व पारनेर तालुक्यात पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिकांचे असहकार आंदोलन चालू आहे.यामुळे जनावरांना पशुवैद्यकांच्या सेवा मिळणे कठीण झाले असून शेतकरी हतबल झाला आहे .

 परिणामी दुग्ध व्यवसायाला या काम बंद आंदोलनाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी उपचारा अभावी जनावरे मरत आहेत.परिणामी पदविका धारक पशुवैद्यकांचा कामाचा ताण वाढला आहे.दुसरिकडे वर्षानुवर्षांपासून शासनाने पशु विभागातील रिक्त पदांची भरती करण्याकडे डोळेझाक केली आहे आहे. त्यामुळे पशुपालकांना सेवा देताना यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.
आंबेगाव तालुक्यात शंभर ते दीडशे पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे पदविकाधारक आहेत. तालुक्यातील सरकारी दवाखान्यात पशुवैद्यक यांचे अनेक वर्षापासून काही ठिकाणी पदविकाधारक यांचे पद रिक्त आहे .

पशुधन पर्यवेक्षक यांचे गेल्या दहा वर्षात नविन एकही पद भरण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी पशुवैद्यक यांवर अवलंबून राहावे लागते आणि त्याच पदविकाधारक सध्या संपावर गेले आहेत . त्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे अगर त्यांच्या व्यावसायिक नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करावा असे आव्हान आंबेगाव तालुका पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे अध्यक्ष डॉ संजय भोर यांनी केले आहे. भोर म्हणाले की आंदोलन सुरू करण्यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले होते . मंत्रालयात त्यांची भेट घेतली असता ते या विषयात लक्ष घालणार असून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

            या वेळी डॉ. शांताराम गावडे, डॉ.निवृत्ती पोखरकर,डॉ निवृत्ती मेहत्रे,डॉ. सुरेश टाव्हरे,डॉ. सचिन खिलारी,डॉ. धनंजय करंडे,डॉ प्रवीण भालेराव, डॉ. बाबासाहेब गांगड,डॉ. संभाजी इंदोरे,डॉ. अशोक भोर,डॉ. गव्हाणे,डॉ. बाळशिराम निघोट, डॉ.संभाजी इंदोरे हे उपस्थित होते.
close