प्रतिनिधी : रफिक शेख
शिंगणापूर : (दि .३१) : महाधन या रासायनिक खतांची निर्मिती करणाऱ्या अग्रगण्य कंपनीचे दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील श्री शैनेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते या ऑक्सिजन निमिती प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी सकाळी झाले.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सह दीपक फर्टिलायझर्सचे (महाधन) कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोरखनाथ बुधवंत, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, विभागीय विक्री व्यवस्थापक श्री राकेश पाटील आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थिती होते.
ऑक्सिजन प्रकल्पाची माहिती देताना महाधन कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, शास्त्रज्ञांनी भाकीत केलेल्या तिसऱ्या कोरोना लाटेला सामोरे जाण्यासाठी महाधन पुढाकार घेत विविध उपाययोजनांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे.
शनी शिंगणापूर येथे उभारलेल्या अत्याधुनिक ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून दर मिनिटाला २५० लिटर ओक्सिजनची निर्मिती करण्याची क्षमता आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व गरजू रुग्णांना ही सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या प्रकल्पामुळे शनी शिंगणापूर तसेच परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळनार आहे. यावेळी खा.संजय राउत यांनी महाधन कंपनीच्या कार्याचे कौतुक केले. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य रुग्णांना आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाधनचे वरिष्ठ व्यवस्थापक आझम शाह, वरिष्ठ व्यवस्थापक सादिक शेख, श्री ओंकार पडवळ,उम्मीद मुजावर तसेच कंपनीचे जिल्ह्यातील महाधन खत विक्रेते रामनारायण लाहोटी, गुरविंदर सिंह वाहि,भागवत भांड,शरद पवार उपस्थित होते .
सदर प्रकल्प उभारण्यात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले तसेच श्री शैनेश्वर ग्रामीण रुग्णालय या संस्थान चे मोलाचे सहकार्य लाभले.
शनी शिंगणापूर व्यतिरिक्त महाधन कंपनीच्या वतीने औरंगाबाद येथील शासकीय कोविड सेन्टर मेल्ट्रॉन तसेच नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथे सुद्धा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जालना व बीड जिल्ह्यातिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एक एक अद्दयावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाधन कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे.

