shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्ता फेब्रुवारीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत.. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे कार्यकर्त्यांना आव्हान

आत्ता फेब्रुवारीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत.. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे कार्यकर्त्यांना आव्हान.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा पुरस्कार देऊन सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: (१ ऑगस्ट २०२१) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा कोविड-१९ योद्धा पुरस्कारांनी विशेष सन्मान तसेच इंदापूर तालुक्यातील आमदार व राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर ,पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने  यांचा विशेष पुरस्काराने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
तसेच यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे, पंचायत समिती मुख्याधिकारी विजयकुमार परीट इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आरोग्य विभागाचे डॉक्टर शेळके व त्यांचे अधिकारी-कर्मचारी इत्यादींचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे काही कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नेमणूक पत्र देऊन सन्मान करण्यात आले

 तसेच प्रदिपदादा गारटकर, प्रवीण माने, हनुमंत कोकाटे, वैभव निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी  अतुल झगडे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी आत्ता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील यावेळी सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत असे आव्हान भरणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

 तसेच राज्यमंत्री  भरणे म्हणाले की , कोरोनाची दुसरी लाट आली होती .यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती . त्यावेळी शासनाचे नियम सर्वांनी पाळले. अशा परिस्थिती मध्ये आशा वर्कर, नर्स, डॉक्टर ,पोलीस प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वांनी कोरोणा काळात चांगले काम केले तसेच राज्यामध्ये पहिला मंत्री मी असा होतो की, ज्याने प्रथम कोरोना हॉस्पिटल मध्ये जाऊन प्रत्यक्ष रुग्णांची विचारपूस करून तेथील सोयी सुविधा प्रत्यक्ष जाऊन पाहिले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी २४ तास तटस्थ उभा राहून काम केले. कोरणा च्या या काळात या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या सुखाचा त्याग करून कार्य केले. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी केला. त्यांचे विशेष अभिनंदन करतो. 

कोरोना काळात सगळ्यात जास्त मदत विविध स्वरूपात इंदापूर तालुक्यामध्ये राज्यात एक नंबरने झाले. असल्याची नोंद राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी केली.

 हे दिवस राजकारण करण्याचे नाहीत. हे दिवस लोकांचे भले करण्याचे दिवस आहेत. कोणी नाही बघितलं तर वरचा बघत असतो .इंदापूरकरांनी पूरग्रस्तांना ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवल्या .त्याबद्दल तेथील मंत्री यांनी इंदापूरकर यांचे आभार मानले आहे .इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मला एवढे तयार केले आहे की, मी आता निधी देण्यामध्ये ही कमी पडत नाही .राज्यातील वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी इंदापूरसाठी आणण्यासाठी माझ्या वाट्याबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार यांचाही मोठा वाटा आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इंदापूर तालुक्यासाठी ८०० कोटी रुपयाच्या कामाचे टेंडर होईल. तसेच डीपीडीसी याच्या माध्यमातून आठ दिवसांपूर्वीच ४१ कोटीचा निधी इंदापूर तालुक्यासाठी दिला आहे. हे मंजूर केले म्हणजे उपकार केले नाहीत तर ते कर्तव्य आहे .कोणतेही काम टप्प्याटप्प्याने व्यवस्थित होते. तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्‍न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याबाबत कोणीही काळजी करायची नाही. त्यासाठी मी काळजी करायला तयार आहे  . पाणी कसं आणायचं ते मी बघतो. शहरात दोन वर्षात जे काम असतील ते करून घ्या. आता फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडून येतील अशा पद्धतीने कामाला लागा. वाढपी आपला असला की माप ढळत पडतं त्या पद्धतीने निवडणुकीच्या कामाला लागा. विकास कामासंदर्भात प्रत्येक गावाचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाईल. यामध्ये कोणीही शंका घेऊ नका असे राज्यमंत्री भरणे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा व इंदापूर तालुका सर्व पदाधिकारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी  उपस्थित होते.
close