हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल राईडचे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी-(२६ ऑगस्ट २०२१)
भिगवण सायकल क्लब, इंदापूर सायकल क्लब आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर
यांचे संयुक्त विद्यमाने FIT INDIA व SAVE NATURE या उपक्रमांतर्गत शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडचे आयोजन केले असून सायकल रॅलीनंतर इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
भिगवण(मदनवाडी चौक) येथे शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे ५:०० वा. सायकल रॅलीस प्रारंभ होणार असून भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईड असा सायकलचा महामार्ग असून भिगवण येथून इंदापूर या ठिकाणी ७:३० वा. मालोजीराजे चौकामध्ये सायकल रॅली येणार असून तेथून पुढे खुळे चौक- बारामती चौक व्हाया नेहरू चौक- शिवाजी चौक - खडकपुरा- एसटी स्टॅंड ते इंदापूर महाविद्यालय असा सायकल रॅलीचा मार्ग असून त्यानंतर महाविद्यालयात बेल या वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.

