shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवन पोलिसांनी अखेर भादलवाडी येथील खुणाचा लावला तपास.

भिगवन पोलिसांनी अखेर भादलवाडी येथील खुणाचा लावला तपास.


इंदापूर प्रतिनिधी: (२६ ऑगस्ट २०२१) भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे एका  ३४ वर्षीय युवकाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, इरिगेशन कॉलनी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली होती.

याबाबत भिगवण पोलिसांनी  तपास सुरु केला असता पोलिसांना खबऱ्या मार्फत खबर मिळाली की मयत महेश याच्या पत्नीचे माहेरील घराशेजारी राहणारा अनिकेत उर्फ बबलु विकास शिदे वय २१ रा.अकोले ता.इंदापूर याच्याशी प्रेम संबंध आहेत.त्यानुसार पोलिसांनी महेशची पत्नी हिचा प्रियकर अनिकेत उर्फ बबलु यास ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र पोलीस खाक्या पुढे त्यांनी कबुली दिली.

माझे मयत महेशच्या पत्नीसोबत प्रेम संबंध आहेत.त्यामुळे मला माझ्या प्रियसीला भेटता येत नव्हते.त्यामुळे रागापोटी मी माझा चुलतभाऊ गणेश हनुमंत शिंदे यास मदतीस घेऊन महेश याचा काटा काढण्याचे नियोजन केले.गणेश शिंदे यांच्या पत्नीचाही घटस्फोट झालेला आहे व तो घटस्फोट हा महेश याने गणेश च्या पत्नीच्या नातेवाईकांना सांगितल्याने झाला आहे. असा समज गणेशचा झाला होता. त्यामुळे गणेश शिंदे व अनिकेत उर्फ बबलु शिंदे यांनी एकत्रित रित्या महेश यास गप्पा मारण्याच्या बहाण्याने नेवून नीरा भिमा नदी जोड बोगद्याजवळील डंपिंग यार्ड येथे निर्जन स्थळी नेऊन त्याचा धारदार कोयत्याने गळा कापून खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते,उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर,वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार नाना बौर, विठ्ठल वारगड,समीर करे, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, महेश माने, संदीप पवार, विजय लोढी, अतुल पठाण, पालसांडे,भांडवलकर, अंकुश माने, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, अनिल काळे, रवीराज काकरे यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकिसाठी प्रयत्न केले आहेत.
close