shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि. प. प्रा. शाळा वांबोरी स्टेशन च्या अध्यक्षपदी आनशाबापू आवारे यांची निवड..!!

राहुरी:  ✒️शिर्डी एक्स्प्रेस-तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे

दि. 24 ऑगस्ट रोजी जि प शाळा वांबोरी स्टेशन येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करणेकमी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.पालक मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी माजी अध्यक्ष श्री मोहन खळेकर हे होते.




मुख्याध्यापक श्री दत्तात्रय नरवडे यांनी प्रास्ताविक करताना शाळा व्यवस्थापन समिती ची रचना व कार्य यावर प्रकाश टाकला.यानंतर उपस्थित पालकांमध्ये चर्चा होऊन पालकांची सदस्य म्हणून निवड.करण्यात आली.यानंतर सदस्यांच्या सर्वानुमते शिक्षण क्षेत्राची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री आनशाबापू आवारे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ रुपाली कल्हापूरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

पालक मेळाव्याला शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच श्री कानिफनाथ कल्हापूरे, उपसरपंच श्री संजय कल्हापूरे,ग्रामपंचायत सदस्य श्री प्रभाकर हरिश्चंद्रे, श्री भरत पवार, निवृत्त स्कोडनलीडर श्री कोंडीराम कल्हापूरे, हे उपस्थित होते.

पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री राजेश भुजबळ सर, श्रीम सुवर्णा कचरे मॅडम, व श्री मंगेश करंडे सर यांनी विशेष प्रयत्न केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे पंचायत समिती माजी सभापती श्री बाळासाहेब लटके साहेब यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री आवारे यांनी शाळेय विकास कामे व विविध योजना अंतर्गत निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.                              

Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600

close