shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द येथे व्हर्टिकल फार्मिंग प्रकारच्या आधुनिक शेतीकडे वाटचाल: मा. खा.सुजय दादा विखे यांची उपस्थती..!!

राहुरी: तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.                              

हायटेक व्हर्टिकल फार्मिंग ए एस ॲग्री अँड एक्वा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ईजराईल , दुबई व युरोप खंडामध्ये जे व्हर्टीकल फार्मिंग चे शेती विषयक तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे  उद्घाटन अहमदनगर  जिल्ह्याचे खासदार माननिय सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.                     

                            





या नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पंचक्रोशीतील भारतीय सेने मधून निवृत्त झालेल्या सर्व   सेनानींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात प्रामुख्याने सुभेदार गोरख जाधव , नितीन, कल्हापूरे, सचिन हरिश्चंद्रे ,प्रताप लांडगे, सचिन हरिश्चंद्रे, देविदास कल्हापूरे, रवींद्र बोर्डे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सुरसिंग राव पवार यांनी आमच्या परिसराचे भूषण म्हणून या प्रकल्पास संबोधले.मान उदयसिंह पाटील यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद माननीय विखे दादांच्या संगतीने पूर्ण करू असे आश्वासन दिले. 

एस ॲग्री अँड एक्वा लिमिटेड कंपनीचे  संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रशांत झाडे व डॉ. साईनाथ हाडोळे राष्ट्रीय कृषी तंत्र संचालक संशोधन, निरंजन कोडले, कमलेश ओझे ,रामदास कोल्हे उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती  कृषिभूषण सुरशिंराव  पवार , कृषिभूषण अशोकराव उंडे, उदयसिंह पाटील, कृष्ण महाराज देशमुख इंदोरिकर, अमोल भनगडे रुद्रदत्त (रिजनल मॅनेजर,सेंट्रल बँक ऑफ इंडिया),खडांबे गावचे सरपंच  कानिफनाथ कल्हापुरे , उपसरपंच संजय कल्हापुरे  प्रभाकर हरिश्चंद्रे ,भरत पवार,बाळासाहेब कल्हापुरे, नितिन कल्हापुरे,अनिल कल्हापुरे, श्री.शाहू विद्यालयाचे क्षिक्षक आप्पासाहेब शिंदे प्रा. सुनील घोलप , गुलाब पवार यांची होती.हा  प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात खडांबे खुर्द  येथे प्रदीप पवार (रिटायर्ड आर्मी), विशाल बानकर, किरण पवार, संजय कोल्हे यांनी मिळून तयार केला आहे . या कार्यक्रमास श्री शाहू विद्या मंदिर खडांबे , ग्रामपंचायत खडांबे आणि संघर्ष क्रिकेट क्लबचे अनमोल योगदान राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. आप्पासाहेब ढोकणे यांनी केली तर आभार श्री अशोक पवार यांनी मानले.                                                                    

Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600

close