shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार नमिता मुंदडा यांची यशस्वी मध्यस्थी ; साळेगावच्या लढ्याला यश : पंधरा दिवसात बस स्टँडचे काम सुरू करण्याचे आश्वासन..!!



---------------------------------------------------
प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
आमदार नमिता मुंदडा व भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या यशस्वी मध्यस्थीने साळेगाव येथील  बस स्टँड व इतर मागण्यासाठी  उपोषणाला  बसलेल्या नागरिकांच्या लढ्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात एसटी स्टँडचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.


या बाबतची माहिती अशी की, साळेगाव येथील माथेफिरूने पाडलेल्या बस स्टॅंडच्या जागेवरच नवीन बस स्टँड बांधकाम करण्यात यावे तसेच अतिक्रमण हटवून फुटपाथ आणि नाली बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी दि.२५  ऑगस्ट रोजी साळेगाव येथील नागरिक शिवाजी चौकातील पाडलेल्या बस स्टॅन उपोषनाला बसले होते. त्याची दखल आमदार नमिताताई मुंदडा आणि जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घेऊन तात्काळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अभियंता मोरे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला आणि पंधरा दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच धारूर आगाराचे आगार प्रमुख स्वामी यांनी उपोषणार्थी यांची भेट घेऊन सदर काम हे जर कोणी अडथळा आणला तर पोलीस बंदोबस्तात काम सुरू करू अशी गवाही दिली. त्या नंतर नंदकिशोर मुंदडा व आगार प्रमुख स्वामी यांच्या हस्ते उपोषणार्थींना पाणी देऊन उपोषण मागे घेतले गेले.

 या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मुळे, सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, रिपाइंचे सचिव पत्रकार गौतम बचुटे, ज्योतिराम बचुटे, माजी उपसरपंच श्रीमंत गित्ते, शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार ज्योतिकांत कळसकर, पांडुरंग इंगळे, संजय इंगळे, गणेश गालफाडे, भागवत मुळे, महादेव गायकवाड यांच्यासह अनेक गावकरी सहभागी झाले होते.

उपोषणस्थळी अनेकांनी दिली भेट ! :-

उपोषणाला भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, शहराध्यक्ष भास्कर मस्के, गालफाडे,  शाहूराव ठोंबरे यांनी भेट दिली.
close