इंदापूर महाविद्यालयात ५८ वेबिनार माध्यमातून विद्यार्थ्यांशी सुसंवाद
हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:(२१ ऑगस्ट २०२१)
राज्याचे माजी मंत्री, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये ५० वर्ष पूर्ण होतअसून महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाविद्यालयाने वेबिनार मालिकेचे आयोजन दि. १४ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ या काळात केले आहे. या वेबिनार मालिकेमध्ये एकूण ५८ वेबिनार वेगवेगळ्या विषयांवर घेण्यात येत आहेत.
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आय. क्यू. ए. सी.) आणि महाविद्यालयातील प्रत्येक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही वेबिनार मालिका आयोजित केलेली आहे. यामध्ये महाविद्यालयातील पदार्थविज्ञान, रसायन शास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, फंक्शनल इंग्लिश, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रंथालय, शारीरिक शिक्षण इत्यादी या विभागांचा समावेश आहे.
या वेबिनार मालिकेचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांशी संवाद साधणे व त्याचबरोबर अनेक विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. यामध्ये कोरोना काळात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणं अतिशय महत्त्वाचं होते. तसेच हा सुसंवाद साधत असताना वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मुलांपर्यंत पोहोचविणे जेणेकरून जगामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये काय काय बदल झाले आहे ते समजले पाहिजे या हेतूने या वेबिनार मालिकेचे आयोजन केले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांनी वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबीनार मध्ये डॉ. जुगल दोषी, प्रा. बी. एन. शिंदे, प्रा. दत्तात्रय संकपाल, डॉ. संजय गायकवाड, डॉ. आर. टी. सपकाळ, डॉ. पद्माकर सहारे, डॉ. भास्कर जंगले, डॉ. पराग चौधरी, डॉ. गणेश सोनवणे, डॉ. लहू गायकवाड, डॉ. विजय शिंदे, डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. संजय भोळे, डॉ. विजयकुमार रणपिसे, श्री. तुषार शेंडे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. काझी, डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. विजय केसकर, डॉ. राजाराम गावडे, सीए प्रशांत भिसे, श्री. अविनाश जाधव, डॉ. प्रीती पटेल, प्रा. मुशाहिद, प्रा. युवराज फाळके, डॉ. नितीन पाटील, डॉ. नयना निमकर या सारख्या संसाधन व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
या वेबिनार मध्ये वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी, शाश्वत शेती आणि पर्जन्यमान, ई- संसाधनांचा वापर, उद्योगधंद्यामध्ये रसायनशास्त्राचे महत्व, Density Functional Theory, सामाजिक संशोधन तत्वज्ञान व पद्धतीशास्त्रे, आर्थिक साक्षरता आणि शेअर बाजाराची तोंड ओळख, इंग्लिश संप्रेषण कौशल्य आणि महत्व, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विद्यार्थिनींचे योगदान, भारतीय सैन्य दलातील करिअरच्या संधी, मानसिक आरोग्य, भारतातील राष्ट्रीय एकात्मता, स्थानिक इतिहास, उद्योजकतेमधून समृद्धीकडे, आपत्ती व्यवस्थापन आणि समाजाची भूमिका, चित्रपटातून इतिहास दर्शन, सर्प ओळख व जनजागृती, ऑनलाईन परीक्षा समस्या आणि मार्गदर्शन, उर्दू लिपी महत्व, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, नियतकालिक व आय कॉलेज वार्ता, राष्ट्रभाषा का जीवन मैं स्थान, दूर शिक्षणात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे महत्व, गड-किल्ल्यांच्या सहलींचे महत्त्व, सूक्ष्मजीवशास्त्राची व्याप्ती व महत्त्व, संशोधन केंद्र आणि संधी यासारख्या या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने आयोजित केलेली आहे.
या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात असून शास्त्रज्ञ, चिकित्सक, अभ्यासू प्राध्यापक, वक्ते, यांचेशी संवाद साधता येत आहे. महाराष्ट्रातील अनेक वक्ते, श्रोते या वेबिणार मध्ये सहभागी होत असल्याचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. संदीप शिंदे आणि सायन्स विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

