shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निंबळक येथे उदयोग व्यवसायासाठी विविध कोर्सेसच्या मोफत प्रशिक्षणासाठी नावनोंदणी शिबिर संपन्न


प्रतिनिधी : आसावरी वायकर

निंबळक : (दि .२२): नगर तालुक्यातील निंबळक येथे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन अंगीकृत असणारा मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून अहमदनगर ऑटो क्लस्टर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे .


 दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . ही योजना ग्रामीण भागातील लोकांना फारशी माहिती नसल्याने नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर ऑटो क्लस्टर चे पदाधिकारी यांच्या सहकार्याने तालुक्यातील तरुणांना ह्या उपक्रमाची माहिती व प्रसिद्धीपत्रक पाठवून व्हॉट्स अपच्या माध्यमातून सहभागी होण्यास आवाहन केले होते. त्यानुसार आज निंबळक येथे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे अभियान घेण्यात आले . 

ग्रामीण भागातील तरुणांनी अशा प्रकारच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहन उपसभापती डॉ .दिलीप पवार यांनी केले .

यावेळी ऑटो क्लस्टर चे कार्यक्रम अधिकारी श्री .वैभव खंदारे, विनायक कोतकर, सुनिल होळकर, संभाजी सोनवणे, विशाल घोलप आदी उपस्थित होते . तसेच प्रवेश नाव नोंदणीसाठी तालुक्यातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते .
close