प्रमोद चौधरी
एरंडोल
जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल येथे देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबविणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची एरंडोल तालुका नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्रे वाटप व सन्मान समारंभ एरंडोल शहरात उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गुणवंतांचा सन्मान करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह क्रीडा साहित्याचे केले वाटप..
यासह एरंडोल तालुका युवा परिषदेच्या वतीने शहरातील १० वी च्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला, तसेच गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले यासह स्कॉलार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देखील भेट दिले, अशाप्रकारे विविध सामाजिक तथा विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने सामाजिक दायित्व निभविले आहे,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर होते,
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून युवा परिषदेच्या कार्याची माहिती दिली,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे...
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा सचिव आकाश धनगर, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक सागर महाजन, स्कॉलर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य गोरख महाजन, जळगाव तालुका सचिव विलास पाटील, पारोळा तालुका उपाध्यक्ष अक्षय निकम, तालुका सचिव भारत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते,
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वाटप व सन्मान समारंभ संपन्न...
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिलिंद सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष राकेश राजपूत, पियूष चौधरी, तालुका महासचिव तुषार माळी, तालुका सचिव चेतन पाटील, हितेश महाजन, आनंद महाजन,हितेश जोशी, तालुका कोषाध्यक्ष तेजस साळी, तालुका समन्वयक राहुल पाटील, प्रथमेश धमने, करण पवार, असलम खान, भूषण चौधरी, कांचन वानखेडे, अनिल वानखेडे या पदाधिकाऱ्यांना मास्क, माहितीपत्रक, नियुक्तीपत्र व गुलाबपष्प देऊन सन्मानित करण्यात आले,
मनोगत
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा सचिव आकाश धनगर, कोमल पाटील यांनी मनोगते व्यक्त केली व मनोगतातून गुणवंत विद्यार्थी व युवा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले,
प्रास्ताविक जिल्हा समन्वयक सागर महाजन यांनी केले, व सूत्रसंचालन पियूष चौधरी यांनी तर आभार तूषार माळी यांनी मानले, 👏🌷

