shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहिण भाऊ यांच्या अनोख्या नात्याचा उत्सव "रक्षाबंधन "

बहीण भाऊ एक अजोड नाते

आपले देवतुल्य पूज्यनीय आई वडील कुठल्याही प्रसंगात आपल्या बरोबर नसतात तेव्हा आपली आपल्या रक्ताची भावंड आपल्या बरोबर आपल्या पाठीशी असतात. आपले आई वडील देवतुल्य आहेत म्हणूनच भावंड देवाचा प्रसाद आणि अंगारा आहेत. ही सर्व नाती म्हणजे देवाने आपल्याला  दिलेला आशिर्वाद आहे.


 जेव्हा आपली आई जवळ नसते तेव्हा बहीण आई बनते आणि जेव्हा वडील जवळ नसतात तेव्हा आपल्या बरोबर पित्रुतुल्य भाऊ असतो. आईच्या पवित्र प्रेम बंधना इतकेच प्रेम माया ममता बहीण देते. आणि वडीलां इतका भक्कम आधार भाऊ देतो. आपल्याला कुठे दुखलं खुपलं तर त्याच्या वेदना आई इतक्याच बहिणीला होतात. आपले दुःख आपल्या वडिलांना कळतं पण ते दाखवत नाहीत तर आधार देतात . तेच आधाराच काम भाऊ करतो. 

भाऊ बहीण हे एक आगळ वेगळच नात आहे. उगाचच नाही लग्नात कान पिळण्याच्या कार्यक्रमात तो मान भावाचाच असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाकडे जाऊन भावाला राखी बांधून रक्षणाचं बंधन घालते. दिवाळीत यम द्वितीयेला  भाऊ बहीणीकडे जाऊन ओवाळून घेतो. भावंडाचं अस नातं जन्मोजन्मी राहो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना.

close