विखे, कर्डिले, पाचपुते यांची विशेष उपस्थिती -
भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे
प्रतिनिधी-रफिक शेख
अ.नगर : ( दि २२ ) : नगर तालुक्यातील आगडगाव, रांजणी, हातवळण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पा. यांच्या शुभहस्ते तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भानुदास बेरड, अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, नगर-श्रीगोंदा मतदार संघ गेल्या पंचवार्षिक मध्ये अभ्यासू व कणखर लोकप्रतिनिधीच्या अभावामुळे विकासापासून वंचित राहिलेला होता. परंतु सद्य परिस्थितीत मतदार संघाला बबनराव पाचपुते साहेब यांच्या रूपाने पुन्हा एकदा अभ्यासू लोकप्रतिनिधी भेटल्यामुळे नगर तालुक्याने पुन्हा एकदा विकासाकडे वाटचाल सुरू केलेली असून निश्चितच येत्या काळात नगर तालुक्यामध्ये विकास कामाचा डोंगर उभा राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.
आगडगाव येथील मारुती मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक ( १० लक्ष ), अ.नगर ते मिरी रस्ता ( २ कोटी ४२ लक्ष ), आगडगाव ते मोरदरा रस्ता ( ९० लक्ष ), कौडगाव-रांजणी ते गोरे वस्ती, भेंडेकर वस्ती रस्ता ( ३ कोटी ८२ लक्ष ), हातवळण ते मांडवगण फाटा रोड ( २५ लक्ष ) इत्यादी विकास कामाचे भूमिपूजन यावेळी होणार असून सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी केले आहे.

