प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: (दि. २२) : सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे सलग तिसऱ्या वर्षी करमाळा येथील गुळसडी रोड येथे स्थानिक व दुर्मिळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये रानभेंडी,बहावा,बकुळ ,अर्जुन ,करंज, बेहडा ताम्हण, पिंपळ, कडुलिंब, वड इत्यादी झाडांचा समावेश आहे.
एग्रीकल्चर इंजिनियर शशिकांत पवार व यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वोदय प्रतिष्ठानचा वृक्ष लागवड उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांना यामुळे चालना मिळत असून अशा उपक्रमासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले. वृक्षारोपणातून स्थानिक जैव विविधता व परिसंस्था समृध्द करण्याचा प्रयत्न हा शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारा ठरेल असे मत शशिकांत पवार यांनी व्यक्त केले .यावेळी सर्वोदय चे अध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव अमरजित साळुंके, उपक्रम प्रमुख सुनिल पवार, तज्ञ मार्गदर्शक गणेश सातव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पुराणिक यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अजित कणसे,सुनिल पवार, विकास माळी, प्राध्यापक विष्णू शिंदे, महेश निकत,शरद पायघन , प्रमोद फंड, प्रसाद कुलकर्णी, सुधीर माने,दीपक लांडगे, मनोज कुलकर्णी, दिनेश मेहर, शिवलाल शिंदे ,जीवन किरवे ,दिपक लोखंडे ,जगताप सर, मनोज सूर्य पुजारी, ॲडव्होकेट रणजीत साळुंके, शिवाजी पाटील, सागर दळवी ,महेश शहाणे,गोपाल वाघमारे, संतोष कांबळे, सुनिल पवार, अजिंक्य लुंगारे, रोहित चिवटे, स्वप्निल पवार, भगवान धगाटे, गणेश स्वामी, पप्पू साडेकर, आणि अमोल रणशूर आदीसह सर्वोदय च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

