अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना जिल्हाध्यक्ष अंजली श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: ( दि.२२ ) : करमाळा येथील तरन्नुम इक्बाल शेख ही टेंभुर्णी येथून प्रसुतीसाठी करमाळा येथे माहेरी आली होती.ती १२ मे रोजी प्रसूत झाली.दरम्यान सासरी टेंभुर्णी येथे कोरोनाने कुटुंबियांवर घाला घातला.परिवारातील पती इक्बाल सह पाच व्यक्ती मरण पावल्या.
आज त्या तीन महिन्याच्या बाळाचे राहतअली चे पितृछत्र कोरोनाने हिसकावून घेतले.
तरन्नूमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
सरकारी मदतीसाठी हे कुटुंब वणवण फिरत असताना राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव यांच्याकडे या कुटुंबाने सहकार्यासाठी विनंती केली.
महिला दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी अंजली श्रीवास्तव, ज्योती पांढरे(अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना करमाळा अध्यक्ष) ,उषा बलदोटा,शगुप्ता शेख, भावना गांधी तसेच अशपाक जमादार(सोलापूर जिल्हा युवा राष्ट्रवादी कौंग्रेस उपाध्यक्ष) पत्रकार विशाल घोलप यांच्या उपस्थितीत मा.कलेक्टर साहेब यांच्याशी या सदर परिस्थितीचे निवेदन दिले.काम होईल असे आश्वासन मा.जिल्हाधिकारी यांनी दिले.
कोरोना महामारीने होत्याचे नव्हते केले पण तरन्नुम शेख सारख्या आईने नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे संगोपन कसे करावे हा प्रश्न तिला भेडसावत आहे.
कुटुंबात आपलं म्हणून कोणी उरले नाही.तरी तिला सरकारी मदत मिळायला हवी असे सोलापूर जिल्हा अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या अध्यक्ष अंजली श्रीवास्तव यांनी सांगितले .

