नगर : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी हे संगणक क्रांतीचे प्रणेते असून एकविसाव्या शतकात पदार्पण करताना देशाने आधुनिकतेचा पुरस्कार करणारे धोरणं त्यांनी घेतली होती.त्यांच्या कारकिर्दीत पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून त्यांची निवड योग्य असल्याचेही त्यांनी सिद्ध केले होते. देशाने आणि पक्षाने त्यांच्या विचारांवर वाटचाल करावी असे आवाहन शहर काँग्रेसचे मा.अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
अहमदनगर शहर काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी (दि.२०) राजीव गांधी यांची ७७ वी जयंती ॲड.नरेंद्र भिंगारदिवे यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी भुजबळ बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव भोरे होते. श्री भोरे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
प्रारंभी रमेश कदम यांनी प्रास्ताविक केले तर ॲड.नरेंद्र भिंगारदिवे यांनी आभार मानले. यावेळी शहर , भिंगार,परिसरातले कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.

