shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मायबाप शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्वरित वीज पुरवठा चालू करावा..

मायबाप शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्वरित वीज पुरवठा चालू करावा..
इंदापूर तालुका किसान काँग्रेस कमिटी च्या वतीने निवेदन पत्र देऊन केली मागणी.

इंदापूर प्रतिनिधी: (२० ऑगस्ट २०२१)इंदापूर तालुक्यातील सुरू असलेल्या शेती पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करून. शेतकरी बांधव हे अजूनही कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत .वापरलेल्या विजेचे मूल्य सुद्धा भरले पाहिजे पण मायबाप शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता विज बिल भरण्यास थोडा वेळ देऊन तालुक्यातील सर्व रोहित्र त्वरित चालू करावे अशा आशयाचे निवेदन पत्र उपविभागीय अभियंता महावितरण इंदापूरचे रघुनाथ गोपने यांच्याकडे इंदापूर तालुक्याचे किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर संतोष होगले यांच्या सहीने हे निवेदन पत्र दि. २१ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर ,उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जाकिर काझी ,इंदापूर तालुका किसान काँग्रेस कमिटीचे डॉक्टर संतोष होगले ,सरचिटणीस निवास शेळके, शहराध्यक्ष रमजान बागवान, आकाश पवार युवराज गायकवाड, चेतन कोरटकर ,महादेव लोंढे ,प्रदीप शिंदे
इत्यादी उपस्थित होते.
close