shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑनलाईन संमेलने कोरोनाकाळाला पर्याय ठरू शकतात. - शशिकांत हिंगोणेकर..!!


शिरूर कासार (प्रतिनिधी) : एकता फाउंडेशन शिरूर कासार परभणी जिल्हा कार्यकारिणी आणि नांदेड जिल्हा कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२९ रोजी श्रावण मासानिमित्त समीक्षक तथा संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय ऑनलाईन काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी तथा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर चे निवृत्त सचिव मा.शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. याप्रसंगी काव्यमहोत्सवात सहभागी कवी कवयित्रींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बहुतेक संमेलनांचे आयोजकांना कोरोनाकाळामुळे प्रत्यक्षात आयोजन करता आले नाही.परंतु त्यावर पर्याय म्हणून या ऑनलाईन संमेलनांनी जुन्यांसह नव्या कवी, लेखक, साहित्यिकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 
एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच कार्यकर्ते अतिशय जीवापाड मेहनत घेतात म्हणून ग्रामीण भागातील साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने जिवंत आहे. जाती, धर्म, पंथ, भाषा, रहिवास अशा कोणत्याही भेदाला एकता फाउंडेशनमध्ये थारा नाही म्हणून या चळवळीच्या रोपट्याचा अल्पावधीतच वटवृक्ष होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही याचा मला अभिमान वाटतो.

काव्यमहोत्सवाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना जीवन जगत असताना प्रत्यक्षात येणारे अनुभव मांडणारी कविता ही चिरकाल टिकणारी असते. त्यामुळे नवोदितांसह प्रस्थापितांनीही स्वानुभवातून कविता लिहिण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या संमेलनात शिलादेवी गायकवाड (आंबाजोगाई), अ‍ॅड.मनिषा आंधळे (परभणी), आरती परळकर, अंजली गवई (बीड), शोभा घुंगरे (परतूर), अजय भराटे, अंकुश नागरगोजे (पाटोदा), डाॅ.कन्नूलाल विटोरे (जालना), दिलीप चारठाणकर (परभणी), अर्चना स्वामी, शिवकन्या पवार (आंबाजोगाई), अमोल इंगळे (अकोला), इम्रान शेख (अहमदनगर), सुनील तोरणे (पुणे) या कवी कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. साहित्यिक जयंत पवार यांना सुरूवातीला श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

एकता फाउंडेशन शिरूर कासार, नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.संगीता घुगे व परभणी जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा.प्रकाश वाकळे यांनी या काव्यमहोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल समीक्षक तथा साहित्यिक अनंत कराड यांनी त्यांचे केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.विठ्ठल जायभाये (सोनपेठ) यांनी केले तर सूत्रसंचालनाची धुरा मनिषा जुमडे (परभणी) यांनी यशस्वीपणे सांभाळली. गंगाखेडच्या इंदुमती कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. या संममेलनाला लेखिका श्रीम.विद्या लटपटे, प्रा.डॉ.निलेश लोंढे, प्रा.डॉ.उज्ज्वला जगताप, राम जोशी, डाॅ.सुचिता पाटेकर (प्राथ.शिक्षणाधिकारी परभणी) श्री.मिलिंद जुमडे, संपादक भुषणजी मोरे, डॉ.विलास इप्पर आदींची विशेष उपस्थिती होती.
         यावेळी फाउंडेशनचे सचिव गोकुळ पवार, उपाध्यक्ष माही शेख, कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर, सहसचिव कैलास तुपे, व्यंगचित्रकार दिपक महाले, राजेश बीडकर, नितीन कैतके, अ‍ॅड.भाग्यश्री ढाकणे, श्रीम.रंजना फुंदे, श्रीम.मिरा दगडखैर, डाॅ.सचिन सानप, प्राचार्य हरिप्रसाद गाडेकर, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, श्रीम.लता बडे, लखुळ मुळे हे सहभागी होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा कार्यकारिणीचे डाॅ.विजयसिंह ठाकूर, डाॅ.हनुमंत भोपळे, डाॅ.मंजुश्री देशमुख, प्रा.शरद वाघमारे, डाॅ.शिवाजी सूर्यवंशी, डाॅ.प्रविण सेलूकर, डाॅ.मनिषा भटकर, प्रा.सुनिता कांबळे, प्रा.आनंद शिंदे, विद्या फड आणि परभणी जिल्हा कार्यकारिणीचे श्री.भुषण मोरे, प्रा.नामदेव आव्हाड, मिलिंद जुमडे, श्री.रणविर नाटकर, प्रा.दिलीप यादव, प्रा.अजिंक्य गोरे, श्री.राजेश दहिभाते, श्री.सोपान घुगे, प्रा.नागेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
close