माझ्या पदाचा उपयोग सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार...राजेसाहेब देशमुख
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माझी बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे . पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग मी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असे मत राडी येथे झालेल्या नागरी सत्कारात बीड जिल्हा काँग्रेसचे नव र्निवाचीत अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी काढले .
राडी येथे गावकऱ्यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ठेवण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते कल्याणराव पाटील हे होते . तर सत्कारमुर्ती म्हणून विचार पिठावर बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख , राष्ट्रीय किसान काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अँड. माधव जाधव , अंबा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमण हनुमंत मोरे , किसान काँग्रेसचे तालूकाध्यक्ष गणेश गंगणे, क्षेत्रीय मराठा संघटनेचे प्रदेशध्यक्ष राहूल मोरे , ग्राम पंचायत सदस्य दत्तात्रे गंगणे हे उपस्थीत होते .
राजेसाहेब देशमुख म्हणाले की सध्या देशामध्ये भाजपा सरकारच्या विरोधात सर्व सामान्य जनतेच्या मनात असंतोषाची लाट निर्माण झाली आहे . भाजपा सरकारने देश विक्री काढला आहे . देशात शेतकरी आंदोलन करत आहेत . पेट्रोल डिजेल चे भाव गगनाला पोहचले आहेत . स्वयपांकाचा गॅस महागला आहे . बेरोजगारी वाढली आहे . तरुणांच्या हाताला काम नाही . उदयोग धंदे बंद पडत आहेत . अदानी आणी अंबानी या भांडवलदाराच्या हातात हे भाजपा सरकार देश देत आहे . हे सरकार देशात व राज्यात जाती जातीत व धर्मा धर्मात भांडणे लावण्याचे काम करत आहे .
येणाऱ्या काळात देशाच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी , प्रदेशध्यक्ष नाना पटोले बीड जिल्हाच्या नेत्या रजनीताई पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसची विचारधारा खेड्यातल्या शेवटच्या सामान्य माणसा पर्यंत पोहचण्याचे काम आपणाला करावयाचे आहे
तसेच अँड. माधव जाधव यांनी कॉग्रेस पक्ष वाढीसाठी आपणाला काम करावे लागणारआहे . तसेच गेल्या दोन वर्षा पासुन बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्या पासुन वंचीत आहे . तरी पालकमंत्री धनजंय मुंढे यांनी शेतक ऱ्यानां पिक विमा मिळवून देवा अशी मागणी केली . या कार्यक्रमाला राडी, दैठणा, मुडेगाव ,वाघाळा ,धानोरा, तडोळा, या गावातील चारशे ते पाचशे नागरीक उपस्थीत होते ..

